Vinesh Phogat disqualified from Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत मंगळवारी भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने महिल्यांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, बुधवारी सकाळी तिला वजन १०० ग्रॅमने जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले.
यानंतर सध्या तिच्याबाबत देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की याबाबत कायदेशीर प्रक्रियाने विरोध करू. तसेच त्यांनी सांगितले की तिचं वजन कसं वाढलं, याबाबत तिच्या प्रशिक्षक आणि पोषणतज्ञांना विचारावं लागेल.
त्यांनी म्हटले, 'इतकी चांगली कुस्ती खेळल्यानंतरही केवळ १०० ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरवण्यात यावे, हे आपल्या देशासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.'
'विनेशसाठी भारत सरकारने प्रशिक्षक पोषणतज्ञ आणि फिजिओही उपलबद्ध करून दिले होते. ते सर्व तिच्यासह गेम व्हिलेजमध्ये होते. तिचं वजन दोन दिवस स्थिर होते. पण एका रात्रीत तिचं वजन वाढलं, यामागील कारण फक्त तिचे पोषणतज्ञ आणि तिचे प्रशिक्षकच सांगू शकतात.'
'भारतीय कुस्ती महासंघ आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करेल. पीटी उषा गेम व्हिलेजमध्ये पोहचल्या आहेत. आता आम्ही चर्चा करू आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी व आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेचा विरोध कसा करू शकतो.'
विनेश ही तीन ऑलिम्पिक खेळणारी पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तसेच महिलांच्या कुस्तीमध्ये ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारीही ती पहिलीच भारतीय ठरली होती. मात्र आता तिला अपात्र ठरवल्याने पदकाला मुकावे लागले आहे. अशात सध्या तिच्यासाठी देशभरातून सात्वन केले जात आहे.
दरम्यान, असेही समजत आहे की बुधवारी डीहायड्रेशनमुळे तिला चक्कर आली असून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिने वजन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण असं असतानाही तिचे १०० ग्रॅम वजन अधिक भरले. या सगळ्याचा त्रास तिला झाल्याचे समजत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.