Navratri 2024 : आई अंबाबाई, तुळजाभवानी अन् रेणुकामातेच्या पूजेत कवड्यांना का आहे स्थान?

दक्षिण भारतात रेणुका, एल्लम्मा, मातंगी, मरीआई, भवानी, महालक्ष्मी, इत्यादी देवीच्या उपासनाक्षेत्रात कवडीचे असाधारण महत्त्व आहे.
Navratri 2024
Navratri 2024esakal
Updated on

Navratri 2024 :

आई अंबाबाई, तुळजापूरची तुळाजाभवानी किंवा इतर देवतांच्या गळ्यात आपल्याला कवड्यांची माळ दिसते. सध्या काही तरूण फॅशन म्हणूनही कवड्यांची माळ घालतात. पण ही कवडी साधारण नाही. ही कवडी देवीच्या पूजेत का आहे महत्त्वाची याबद्दल जाणून घेऊयात.

दक्षिण भारतात रेणुका, एल्लम्मा, मातंगी, मरीआई, भवानी, महालक्ष्मी, इत्यादी नावांनी गाजलेल्या देवीच्या उपासनाक्षेत्रात कवडीचे असाधारण महत्त्व आहे. गोंधळी, भुत्ये, पोतराज, मातंगी, जोगती, जोगतिणी हे देवीचे उपासकवर्ग आपल्या अंगाखांद्यावर कवड्यांचे नाना परींचे अलंकार परिधान करतात.

गोंधळ्यांच्या, भुत्यांच्या, मातंगी-जोगतिणींच्या गळ्यांत कवड्यांच्या माळा असतात; भुत्यांचे शंक्वाकार टोप बाहेरून कवड्यांनी मढविलेले असतात.

Navratri 2024
Navratri 2024 : तुळजापूर, माहूरमध्ये गर्दीचा ओघ सुरूच...तुळजाभवानीमातेची मुरलीअलंकार महापूजा

जोगतिणींच्या 'जगां'ना कवड्या गुंफलेल्या असतात; काखेत अडकवलेल्या भंडाराच्या पिशव्यांनाही कवड्या लावलेल्या असतात. मातंगींच्या परड्या कवड्यांनी सजविलेल्या असतात; आणि या सर्व उपासकवर्गाच्या कंठातून वक्षःस्थळावर लोंबत असलेली देवीप्रतिमा ज्या जाड वस्त्रपटावर जडवलेली असते, तो पटही कवड्या गुंफून शोभिवंत केलेला असतो. प्रत्यक्ष देवीलाही कवड्यांचा शिणगार प्रिय असल्याची धारणा देवीविषयक लोकगीतांत वारंवार व्यक्त झालेली आहे.

Navratri 2024
Navratri 2024: नवरात्रीत अष्टमी अन् नवमीला 'या' 5 वस्तू करा खरेदी, घरात कायम राहील सुख-समृद्धी

पिवळा पीतांवर अंबाला नेसण्याला ।

पिवळा पीतांबर देवीला नेसण्याला ।।

कवड्यांचा शिणगार अंबानं केला ।

वो देवीनं केला ॥

Navratri 2024
Navratri Rangoli 2024: कन्यापूजनाच्या दिवशी अंगणात काढा सोप्या अन् सुंदर रांगोळी डिझाइन्स, माता दुर्गा होईल प्रसन्न

कवडी आहे योनिप्रतीक

देवीच्या उपासनेत आढळणारे कवडीचे हे असाधारण स्थान कवडीच्या योनिसदृश आकारामुळे आहे. कवडी ही वस्तू जगभरच्या संस्कृतीत योनिप्रतीक मानली गेली आहे. सामान्यतः वांझपणाचे निराकरण करण्यासाठी कवड्यांचा नेहमी वापर केला जातो. अन्य सर्व सुफलनकारक यातुयुक्त वस्तूंप्रमाणेच कवड्यांमध्येही सर्व प्रकारच्या अनिष्टांचे निवारण करण्याचे सामर्थ्य असल्याची श्रद्धा आढळते.

कवडी ही अशा प्रकारे योनिप्रतीक म्हणून स्वीकारली गेल्यामुळे, सर्जनाच्या देवतांना ती प्रिय मानली जावी आणि त्यांच्या उपासनेत तिला असाधारण स्थान लाभावे, यात अस्वाभाविक काही नाही.

Navratri 2024
Navratri 2024 :  एड्सग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी दुर्गा कुंदन, ती देतेय मुलांना मायेची ‘करूणा’

कवडीचा उगम कुठे?
कवडी ही शंख शिंपल्याबरोबरच समुद्रातून शोधली जाते. गुजरात, गोवा, कोकण आदी समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागातून कवडी मुख्यत: धार्मिक स्थळांवर विकायला येते. साधारण चारशे रुपये किलोप्रमाणे ती सध्या मिळते. एका किलोत आकारानुसार दोनशे ते अडीचशे कवड्या बसतात. रामकुंड, त्र्यंबकेश्वर आदी धार्मिक स्थळी शंख-शिंपल्यांबरोबरच कवड्याच्या माळा विकणारे पथारीवाले असतात. व्यक्तीच्या गरजेनुसार व त्याच्या आर्थिक कुवतीनुसार पाच रुपये ते अगदी काळी कवडी असेल तर ५० रुपयांपर्यंतही ती विकली जाते.

Navratri 2024
Navratri 2024: कन्यापूजनदिवशी मुलींना द्या याच भेटवस्तू, देवी होईल प्रसन्न

विवाहविधीत कवडीचे महत्त्व

काही जाती-जमातींमध्ये वधूला देज देण्याची जी प्रथा आहे, तीत कवडीचा समावेश अत्यावश्यक मानला जातो. आंध्रमधील एरुकल जमातीत वधूपित्याला जे देज देतात, त्यात काही कवड्यांचा प्रतीकात्मक समावेश आवर्जून केला जातो. पंजाबात वधूला द्यावयाच्या वस्तूंमध्ये चरख्याचा समावेश असतो आणि विशेष म्हणजे हा चरखा काही कवड्यांनी सजवावा लागतो.

विवाहानंतर वधू जेव्हा पित्याचे घर सोडून सासरी जायला निघते, तेव्हा तिला नित्यावश्यक वस्तूंनी भरलेली एक पाटी माहेराकडून भेट म्हणून देण्याची प्रथा भारताच्या काही भागांत आहे. ओरिसात या पाटीला 'जगथी पेडी' म्हणतात, तर आंध्रमध्ये तिला 'कविड पेट्टे' असे म्हणतात. या पाटीत कवड्या असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.