Creative Nap : डुलकी घेताना तुम्हाला क्रिएटिव्ह आयडिया सुचतात का? ही ट्रिक वाढवेल क्रिएटीव्हिटी

बऱ्याच लोकांना झोपेच्या सुरुवातीच्या टप्प्यातून जागे झाल्यानंतर ते जास्त क्रिएटिव्हली काम करतात.
Creative Nap
Creative Napesakal
Updated on

Linking Between Nap And Creativity Is Revealed :

हायलाइट्स

  • जेव्हा तुम्हाला झोपतान एखाद्या विषयाबद्दल स्वप्न पाहण्यास सांगितले जाते, तेव्हा तुम्हाला स्वप्न अनुभव येऊ शकतात, जे तुम्ही नंतर या क्रिएटिव्ह गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकतात.

  • शास्त्रज्ञांनी डॉर्मिओ नावाचे एक उपकरण विकसित केले आहे जे टार्गेट ड्रीम इन्क्युबेशनसाठी वापरले जाऊ शकते.

  • यात एक हातमोजा असतो जो झोपेचे तीन शारीरिक मार्कर मोजतो - मसल्स टोन, हृदय गती आणि त्वचेच्या प्रवाहात बदल. हे स्मार्टफोन किंवा कंप्युटरशी कनेक्ट करता येते.

तुम्हालाही दुपारी किंवा दिवसभरात पटकन एखादी डुलकी घ्यायला आवडते का? आणि त्या पॉवर नॅपने खरच पॉवर येउन काहीतरी क्रिएटिव्ह करावसं वाटतं? जर असं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी गुडन्यूज ठरणारी आहे.

बऱ्याच लोकांना झोपेच्या सुरुवातीच्या टप्प्यातून जागे झाल्यानंतर ते जास्त क्रिएटिव्हली काम करतात. एमआयटी आणि हार्वर्डच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही झोपलेले आणि जागे राहणे (ज्याला झोपेची सुरुवात म्हणून देखील ओळखले जाते) दरम्यान अडकलेले असता तेव्हा सर्जनशील मन विशेषतः सुपीक म्हणजेत अॅक्टिव्ह असते.

संशोधकांना असेही आढळून आले की जेव्हा लोकांना त्या झोपेच्या टप्प्यात एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल स्वप्न पाहण्यास सांगितले जाते, तेव्हा त्या विषयावर तीन सर्जनशील कार्ये करण्यास सांगितले जाते, त्यावेळी ते अधिक सर्जनशीलतेने कार्य करतात.

Creative Nap
Sleeping Tips : दुपारी झोपणे योग्य की अयोग्य ?
Creative Nap
Creative Napesakal

डुलकी क्रिएटिव्हिटी कशी वाढवते?

"जेव्हा तुम्हाला झोपतान एखाद्या विषयाबद्दल स्वप्न पाहण्यास सांगितले जाते, तेव्हा तुम्हाला स्वप्न अनुभव येऊ शकतात, जे तुम्ही नंतर या क्रिएटिव्ह गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकतात," असं एमआयटीच्या वरिष्ठ आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखकांपैकी एक कॅथलीन एसफहानी म्हणाल्या.

ज्या लोकांना प्रॉम्प्ट मिळाले आहे, त्यांना "टार्गेट ड्रीम इन्क्युबेशन" असेही म्हणतात ते विशिष्ट प्रॉम्प्टशिवाय डुलकी घेतलेल्या किंवा जागृत राहिलेल्या लोकांपेक्षा जास्त क्रिएटिव्ह कथा सांगू शकल्याचं आढळलं. निष्कर्षांनुसार, ही स्वप्नस्थिती मेंदूला भिन्न संकल्पनांमध्ये संबंध निर्माण करण्यास सक्षम करते, ज्यामुळे, सर्जनशीलतेला चालना मिळते, असंही त्या म्हणाल्या.

Creative Nap
Afternoon Sleep कंट्रोल होत नाही, काय आहे कारण? या आजारांचा धोका
Creative Nap
Creative Napesakal

"तुम्ही मेंदूच्या या अवस्थेमध्ये प्रवेश केल्यास, तुम्ही तुमच्या जागृत जीवनात अधिक सर्जनशील होऊ शकता," असे अभ्यासाचे दुसरे प्रमुख लेखक अॅडम हार होरोविट्झ म्हणाले. हे काहींना माहितच असेल की झोपेचा प्रारंभिक टप्पा, ज्याला N1 किंवा हिप्नागोगिया असं म्हणतात, तो क्रिएटिव्ह आयडियांसाठी उत्तम असतो. वैज्ञानिक अहवालात प्रकाशित करण्यात आलेल्या नवीन अभ्यासात, शास्त्रज्ञांना हे शोधायचे होते की लोकांच्या स्वप्नांना दिशा देणे शक्य आहे का आणि त्याचा त्यांच्या सर्जनशील प्रक्रियेवर कसा परिणाम होईल.

Creative Nap
Sleep Management रात्री झोपण्यापूर्वी ही चूक अजिबात करू नका, नाहीतर पडाल आजारी

काय आहे हा प्रयोग?

शास्त्रज्ञांनी डॉर्मिओ नावाचे एक उपकरण विकसित केले आहे जे टार्गेट ड्रीम इन्क्युबेशनसाठी वापरले जाऊ शकते. यात एक हातमोजा असतो जो झोपेचे तीन शारीरिक मार्कर मोजतो - मसल्स टोन, हृदय गती आणि त्वचेच्या प्रवाहात बदल. हे स्मार्टफोन किंवा कंप्युटरशी कनेक्ट करता येते.

जेव्हा कोणीतरी हातमोजे घातलेले N1 झोपेच्या अवस्थेत प्रवेश करते, तेव्हा अॅप त्यांना विशिष्ट विषयाचे स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करते. ते झोपेच्या पुढच्या टप्प्यात जाण्यापूर्वी, अॅप त्यांना जागे करते, ते कशाबद्दल स्वप्न पाहत होते ते त्यांना विचारते आणि त्यांचे प्रतिसाद रेकॉर्ड करते.

प्रयोगात काय आढळले?

  • या प्रयोगादरम्यान त्यांनी 49 सहभागींवर या उपकरणाची चाचणी केली.

  • त्यांनी 45 मिनिटे डुलकी घेतली त्यांच्या सर्जनशीलतेच्या दृष्टीने सर्वोत्तम कामगिरी असल्याचे आढळले.

  • मूलत:, अभ्यासात असे आढळून आले आहे की झोपेच्या प्रारंभाच्या वेळी, मेंदू अशा संकल्पना एकत्र आणण्यास सक्षम असतो की तो जागृत होण्याच्या वेळेस कनेक्ट होऊ शकत नाही.

  • शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या प्रयोगासाठी डॉर्मिओ उपकरणच हवे असे काही नाही. झोपेचा मागोवा घेणारे आणि प्ले आणि आवाज रेकॉर्ड करणारे कोणतेही उपकरण या प्रकारच्या अभ्यासासाठी योग्य आहे.

  • आता, शास्त्रज्ञ या स्वप्नातील इन्क्युबेशन प्रोटोकॉलचा REM सारख्या नंतरच्या झोपेच्या टप्प्यांपर्यंत कसा विस्तार करायचा याचे मूल्यांकन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.