Health Tips: जेवल्यानंतर तुम्हालाही झोप येते का? हा 'फूड कोमा' असू शकतो

काही लोकांना जेवण झालं की तीव्र झोप येते.
Food coma
Food comasakal
Updated on

फूड कोमा (Food Coma): खूप खाल्ल्यानंतर अनेकांना झोप येऊ लागते. लोकांना ही गोष्ट सामान्य वाटते, परंतु तसं नाही. या स्थितीला फूड कोमा (Food Coma) म्हणतात. वैद्यकीय भाषेत या समस्येला 'प्रांडियल सोमनोलेंस' (Postprandial Somnolence) म्हणतात. या आजारात अति खाल्ल्याने झोप येते आणि थकवा जाणवतो. शरीरात आळस येऊ लागतो आणि कोणतेही काम करावंसं वाटत नाही. खाल्ल्यानंतर रक्ताभिसरणात बदल झाल्यामुळे ही समस्या उद्भवते, असे डॉक्टरांचे (Doctor) म्हणणे आहे. यात काळजी करण्यासारखे काही नाही, परंतु जर तुम्ही असं कोणतेही काम करत असाल ज्यामध्ये सतत लक्ष केंद्रित करावे लागते, तर तुम्हाला हे टाळण्याची गरज आहे. (Do you fall asleep after eating? It can be a food coma)

Food coma
भारताची मिसाईल पाकमध्ये आग: एअरफोर्सचे डेप्युटी चीफ अन् 2 मार्शल बडतर्फ

वरिष्ठ फिजिशियन डॉ. कवलजीत सिंग सांगतात की, फूड कोमाबाबत कोणतेही विशेष कारण समोर आलेले नाही. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की, खाल्ल्यानंतर पोटात रक्तप्रवाह वाढल्याने मेंदूपर्यंत रक्त कमी पोहोचते, त्यामुळे असे होते, तथापि, हा सिद्धांत देखील स्पष्टपणे सिद्ध केला गेला नाही. जी माहिती समोर आली आहे त्यावरून असे दिसून येते की ही समस्या जास्त जेवण करणाऱ्या लोकांना होते. आहारात काय घेतले जाते यावरही ते अवलंबून असते. जर अन्नामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असेल तर फूड कोमा होण्याची शक्यता जास्त असते. याचे कारण असे की चरबीमुळे शरीरातील कोलेसिस्टोकिनिन हार्मोनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे झोप येते.

Food coma
Video: तांत्रिक बिघाडामुळे भारतीय मिसाईल पाकमध्ये

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अन्नामध्ये जास्त प्रोटीन असले तरी ही समस्या उद्भवू शकते. ट्रिप्टोफॅन हे उच्च प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये आढळणारे अमिनो आम्ल आहे. ट्रिप्टोफॅन जितके जास्त तितके शरीरात सेरोटोनिनची पातळी जास्त असते. यानंतर झोप येते. जर एखाद्याला सामान्य अन्न खाल्ल्यानंतरही झोप येत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही रक्तातील साखरेची तपासणीही करत राहायला हवी. जर चाचणीमध्ये साखरेची पातळी जास्त असेल तर याचा अर्थ असा होतो की ही समस्या फूड कोमामुळे नाही तर मधुमेहामुळे आहे.

फूड कोमापासून कसं वाचावं?

नेहमी संतुलित आहार घ्या आणि जास्त खाणे टाळा

बाहेरचं अन्न खाऊ नका

दररोज किमान 8 तास झोप घ्या

खाल्ल्यानंतर तुम्हाला झोप येत असेल, तर काही वेळ कामातून ब्रेक घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.