Healthy Tips: बदलत्या वातावरणात सर्दी, ताप, खोकल्याचे रूग्ण वाढले, योग्य आहार, झोप घेण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ला

Healthy Tips: छत्रपती संभाजीनरमध्ये मागील काही दिवसांपासून, कधी कडक ऊन, तर कधी पाऊस होत असल्याने वातावरणात सारखे बदल होत आहेत. यामुळे अख्ख्या शहराला सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखीने घेरले आहे.
Healthy Tips:
Healthy Tips: Sakal
Updated on

Healthy Tips: छत्रपती संभाजीनरमध्ये मागील काही दिवसांपासून, कधी कडक ऊन, तर कधी पाऊस होत असल्याने वातावरणात सारखे बदल होत आहेत. यामुळे अख्ख्या शहराला सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखीने घेरले आहे. एकाच रुग्णालयात दिवसाला ७० पेक्षा अधिक रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मागील काही दिवसांत सतत ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. याबदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे गल्लोगल्ली असलेले शासकीयसह खासगी रुग्णालयेदेखील रुग्णांनी हाउसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळते. यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, घशात संसर्ग, ताप, अंगदुखी, शिंका येणे, घश्यात खवखवणे अशी लक्षणे असलेल्या आजाराच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. एकाच रुग्णालयात ७० पेक्षा अधिक रुग्ण या आजाराचे येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.