Sleep Problem: अनेकांना दिवसभर काम करून थकल्यानंतर देखील रात्री शांत झोप येते नाही. कधीकधी जास्त वेळ झोपमोड झाल्याने चिडचिडपणा वाढू शकतो. अनेक लोकांना रात्री झोपमोड झाल्याने दुसऱ्या दिवशी उत्साही वाटत नाही. तसेच कोणतेही काम नीट होत नाही. झोपमोड होण्यामागे तणाव, चिंता, अतिविचार यासारख्या गोष्टी असू शकतात. अनेकांना झोपमोड झाल्यावर पुन्हा झोप येत नाही. तुम्हालाही झोपमोड झाल्यावर पुन्हा झोप येत नसेल तर पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.