आपल्या शरीराला जितकी सकस आहार, व्यायामाची गरज आहे, तशी शांत झोपेची गरज सुद्धा आहे. काही लोकांच्या कामाच्या वेळा या रात्रीच्या असतात. त्यामुळे त्यांना दिवसा झोपावं लागतं. तर काही लोक उगीचच जागरण करतात, त्यामुळे त्यांना रात्री उशीरा झोपावं लागतं.
रात्री चांगली झोप घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच वेळेवर झोपणे आणि उठणेही महत्त्वाचे आहे. अनेक अभ्यासात सांगितले की प्रत्येकाने रात्री 10 वाजेपर्यंत झोपले पाहिजे. चयापचय व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून तुमचे रक्षण करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.