दुपारी झोपायची चूक तुम्हीही करता का? आताच थांबवा नाहीतर..

तुम्हाला माहिती आहे का की दुपारी झोपणे आपल्यासाठी चांगले आहे का वाईट? चला तर जाणून घेऊया.
sleeping
sleepingsakal
Updated on

अनेकजणांना दिवसा झोपायची सवय असते. विशेषत: अनेकजण काम आटोपल्यानंतर दुपारी झोपतात. पण तुम्हाला माहिती आहे का की दुपारी झोपणे आपल्यासाठी चांगले आहे का वाईट? चला तर जाणून घेऊया.

sleeping
Sleeping Record : ऐकावं ते नवलच! भारतीय मुलीने झोप काढून जिंकले लाखो रुपये

आयुर्वेदानुसार काय म्हणतं?

आयुर्वेदानुसार दिवसा झोपणे चुकीचं आहे. दिवसा झोपल्याने अनेक आरोग्याच्या समस्या वाढतात. रक्ताभिसरणात अडथळे येतात. त्यामुळे डोकं जड वाटतं, अपचन, श्वास घ्यायला त्रास होतो. याशिवाय आळस आणि कंटाळा येतो. त्यामुळे दुपारी झोपणे शक्यतो टाळावेत.

sleeping
Sleep Routine : साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपत असाल तर सावधान!

दुपारी कोणी झोपावे?

बऱ्याच जणांना दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपण्याची सवय असते. मात्र हे चुकीचं आहे. याशिवाय दुपारी फक्त १० मिनीटे झोपावे, असं तज्ञ म्हणतात. मात्र आजारी किंवा लहान मुल किंवा वृद्ध व्यक्तींनी दुपारी आराम करावा. याशिवाय रात्री नोकरी किंवा काम करुन आलेले व्यक्तींनी दुपारी झोपावे. मासिक पाळीत महिलांनी दुपारी आराम करावा.

दुपारी कोणी झोपू नये?

ज्यांना कफचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दुपारी झोपू नये. याशिवाय लठ्ठ व्यक्तींनीही रात्री झोपणे टाळावे. तसेच सतत अॅसिडिटीचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनीही दुपारी झोपणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.