Brain Decision Making: तुम्ही दिवसाला ३५,००० निर्णय घेता, हे तुम्हाला कळतंही नाही! पटत नसेल तर हा रिसर्च वाचा

Brain and Psychology: आज जिमला जाऊ की नको? की जायला हवं? ऑफिसला जावं की नाही? मग टिफिनमध्ये काय घेऊ की बाहेरच खावं? अशा बारीकसारीक गोष्टी याही आपल्या या निर्णयाचा भाग असतात, पण त्या आपल्याला जाणवत नाही.
Decision Brain
Decision Brainesakal
Updated on

How Many Decisions Humans Make in One Day

मुंबई : माणसाच्या मेंदूत घड्याळाच्या काट्याप्रमाणे टक टक सुरूच राहते. सकाळी सुरू झालेले हे चक्र रात्री बिछान्यावर पडेपर्यंत सुरूच असते आणि या चक्रात तुम्ही किती निर्णय घेता हे कळल्यावर कुणालाही धक्का बसेल, अशी आकडेवारी समोर आली आहे. चहा घ्यायचा की कॉफी? नाश्ता करायचा का? केलाच तर काय खायचं? इथपासून ते रात्री झोपण्यापूर्वी उद्या कितीचा अलार्म लावायचा? इथपर्यंत एक व्यक्ती साधारण दिवसाला ३३ ते ३५,००० निर्णय घेते. चक्रावलात ना?

आपण दिवसभरात किती निर्णय घेतो?

सकाळपासून ते दिवस संपेपर्यंत एक व्यक्ती किमान ३३ ते ३५ हजार निर्णय घेते, असे Harvard Business च्या अहवालात म्हटले आहे. हार्वर्ड बिझनेस अहवालानुसार, प्रौढ व्यक्ती दररोज सरासरी ३३ ते ३५ हजार निर्णय घेते. यापैकी बरेच निर्णय त्वरीत आलेले असतात आणि एकाच वेळी काही निर्णय आपोआप घेतले जातात.

निर्णय प्रक्रियेत Influence करणारे घटक

अनेकदा काही निर्णय अधिक कठीण असतात आणि ते घेण्यापूर्वी जाणीवपूर्वक विचार करण्याची आवश्यकता असते. असे निर्णय जे आपल्या पुढील आयुष्यावर परिणाम करणारे ठरू शकतात. यासाठी ते घेण्यापूर्वी पुरेसा वेळ देणे गरजेचे असते. असे निर्णय घेण्यासाठी भूतकाळातील अनुभव, सद्य परिस्थिती, निर्णयानंतरचे परिणाम आदी घटक खूप महत्त्वाचे ठरतात. या सर्व गोष्टींचा निर्णय प्रक्रियेवर परिणाम करतात.

Decision Brain
Decision Brainesakal

निर्णय घेऊन थकवा येतो का?

आज जिमला जाऊ की नको? की जायला हवं? ऑफिसला जावं की नाही? मग टिफिनमध्ये काय घेऊ की बाहेरच खावं? अशा बारीकसारीक गोष्टी याही आपल्या या निर्णयाचा भाग असतात, पण त्या आपल्याला जाणवत नाही. तुमचा मेंदू त्यामुळेच दिवसअखेरीस थकलेला जाणवतो. अशा वेळी तुम्हाला जलद आणि त्वरित निर्णय घेण्यात अडचण येते. ओव्हरलोडमुळे थकवा जाणवतो आणि मरगळल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत स्वतःला थोडा वेळ देणे आणि निवांत राहणे आवश्यक आहे.

युनायटेड किंग्डमच्या लिसेस्टर युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका इव्हा क्रोकोव यांच्या मते सकाळी ब्रेकफास्ट बनवण्यापासून किंवा कोणते कपडे घालावे, असे जवळपास ३५ हजार निर्णय एक व्यक्ती दिवसाला घेते. इतके निर्णय घेऊन थकवा जाणवतो. निर्णय कितीही तुरळक किंवा मोठे असले तरी त्यांना सामोरे जावे लागते, असे अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेच्या असोसिएशनचे सराव संशोधन आणि धोरणासाठी सहयोगी कार्यकारी संचालक लिन बुफ्का यांनी सांगितले.

चांगले निर्णय घेता यावे यासाठी काय करावं?

निर्णय अंमलबजावणी योग्य की नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. समोर उपलब्ध पर्यायांपैकी सगळ्यांचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूने विचार केला गेला पाहिजे. व्यावहारिक निर्णय घ्यायला शिकायला हवं. त्यासाठी स्वतःवरील विश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेता आले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.