सुखाच्या झोपेसाठी घरच्या घरी वापरा ही उपचारपद्धती

या उपचाराने ताणतणाव आणि मायग्रेमुळे होणारी डोकेदुखी नाहिशी होते.
nasya
nasya google
Updated on

मुंबई : Nasya हा एक आयुर्वेदिक उपचार असून याचा वापर खांद्यांच्या वर होणारे आजार बरे करण्यासाठी केला जातो. निद्रानाशासाठी (insomnia) हा उपचार उपयुक्त आहे. निद्रानाशाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला झोप येत नाही किंवा कमी कालावधीसाठी येते. यामुळे विविध आजार जडतात. विशेषत: मानसिकतेवर परिणाम होतो. आयुर्वेद डॉक्टर दिक्षा भावसार सावलिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून या उपचाराची प्रक्रिया सांगितली.

nasya
आरोग्यसखी : ‘सुखाची झोप’ येण्यासाठी...
nasya
आहारात बदल व नियमित व्यायाम हाच मुख्य उपचार योग्य जीवनशैली आत्मसात करा, रक्तदाब टाळा

घरीच कसे कराल उपचार ?

आवश्यक साहित्य - गायीचे तूप, कापूस किंवा ड्रॉप

प्रक्रिया

तूप कढवून घ्या. ते पूर्ण विरघळू द्या. त्यानंतर हे तूप कापसाच्या साहाय्याने दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन थेंब टाका.

कधी ?

सकाळी किंवा रात्री

nasya
निद्रानाश, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्निया म्हणजेच कॉस्मिया

या आजारांपासून मिळेल मुक्ती

  • निद्रानाश

  • ऑटो इम्यून थायरॉइड

  • रुमेटीइड आर्थराइटिस

  • मल्टीपल स्केलेरोसिस

nasya
झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्याने निद्रानाश, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचा अहवाल

डॉ. दीक्षा सांगतात की, नस्य ही उपचारपद्धती आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय या उपचाराने ताणतणाव आणि मायग्रेमुळे होणारी डोकेदुखी नाहिशी होते. रोगप्रतिकारशक्ती आणि स्मरणशक्ती सुधारते. मानसिक आरोग्य सुधारते. केसगळती आणि केस पिकणे यांपासूनही दिलासा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.