Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

Navratri 2024: पाच वर्षाच्या मुलींना पुढील महत्वाच्या गोष्टी शिकवल्यास तिला भविष्यात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही.
Navratri 2024
Navratri 2024Sakal
Updated on

Navratri 2024: शारदीय नवरात्री सुरू होऊन चार दिवस झाले आहे. आज कुष्मांडा देवीची पुजा केली जाते. मान्यतेनुसार मात दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात.

प्रत्येक आई-वडीलांना आपले मुले हुशार असावी आणि सुरक्षित असावी असे वाटते. पालक आपल्या मुलींबद्दल खूप सावध असतात. कारण आधुनिक काळात मुलींना समान दर्जा देण्याबरोबरच त्यांना योग्य शिक्षण देणेही अत्यंत गरजेचे झाले आहे.

यामुळे त्यांना भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. मुलींना योग्य शिक्षण देण्यासाठी वयोमर्यादा नाही, परंतु जर तुम्ही तुमच्या मुलींना लहानपणापासूनच योग्य गोष्टी शिकवल्या तर भविष्यात त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होणार नाही.

आपल्या हक्कांसाठी लढा देणे

जर मुली चुकत असतील तर त्यांना समजावून सांगावे. पण त्यांना त्याच्या हक्कासाठी देखील बोलायला शिकवावे. मुलींना होणाऱ्या अत्याचाराविरोधात बोलायला शिकवले पाहिजे. जेणेकरून भविष्यात त्यांचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकणार नाही.

स्वत: चे निर्णय घेणे

लहानपणापासूनच मुलींना योग्य गोष्टी शिकवायला सुरूवात करावी. जर तुमची मुलगी 5 वर्षांची झाली असेल आणि छोट्या छोट्या गोष्टी समजू लागल्या असतील तर तिला नक्कीच स्वतःसाठी निर्णय घ्यायला शिकवा. जसे की छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना निर्णय घेण्याची सवय लावावी. उदा. कपडे निवडणे, चॉकलेट खरेदी करणे यासारख्या गोष्टींसाठी निर्णय घेतल्यास भविष्यात अडचणी येणार नाही.

Navratri 2024
Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

चुकांकडे दुर्लक्ष करू नका

आई-वडील अनेकवेळा मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात. त्याचबरोबर काही पालक असे असतात जे त्यांच्या चुकांसाठीही त्यांना पूर्ण साथ देतात. असे केल्याने मूले प्रत्येकवेळी स्वतःला योग्य समजू लागतात आणि सर्वांशी वाद घालायला शिकतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या चुका समजावून सांगून योग्य मार्गाने चालायला शिकवावे.

आदरयुक्त वागणूक

मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाला योग्य वागणूक शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वात आधी तुम्हाला सुरुवात करावी लागेल. तुमच्या मुलाने सर्वांशी चांगले वागावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यासमोर सर्वांशी चांगले वागले पाहिजे. तसेच मुलांना लोकांशी योग्य बोलण्यास आणि वागण्यास शिकवावे. जेणेकरून त्यांना लोकांचे महत्त्व कळेल.

गुड टच बॅट टच

जर तुमची मुलगी 5 वर्षांची असेल तर तुम्ही तिला गुड टच बॅट टच शिकवला पाहिजे. कारण आजच्या काळात तुम्ही अशा अनेक घटना ऐकल्या असतील ज्यात लहान मुली शोषणाच्या बळी ठरत आहेत. अनेक वेळा मुलींना लोकांच्या चुकीच्या भावना समजत नाहीत. अशावेळी पालकांनी आपल्या लहान मुलीला गुड टच आणि बॅड टच बद्दल सांगितले पाहिजे. जेणेकरून भविष्यात त्यांना कोणतीही दुर्घटना होणार नाही .

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.