Garba Outfit Ideas: शारदीय नवरात्रीचा उत्सव देशभरात आनंदाने साजरा केला जात आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच नऊ दिव नऊ रंगाचे कपडे परिधान करून गरबा किंवा दांडिया खेळला जातो. देवीसमोर गरबा खेळणे शुभ मानले जाते.
गरबा खेळण्यासाठी महिला मेकअपसह ड्रेसकडेही लक्ष देतात. गरबा खेळण्यासाठी घागरा हा एक उत्तम पर्याय आहे. अनेक महिला बॉलिवूड अभिनेत्रींचा लूक कॅरी करतात. तसेच ट्रेंडनुसार कपडे खरेदी करतात. जर तुम्ही गरबा नाईटसाठी लेहेंगा घालण्याचा विचार करत असाल तर या तीन अभिनेत्रींच्या लूकवरून टिप्स घेऊन तुम्ही तयार होऊ शकता.
जर तुम्ही गरबा नाईटला रॉयल लुक कॅरी करण्याचा विचार करत असाल, तर कंगनाचा हा लेहेंगा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या लेहेंग्यात गोल्डन वर्क आहे, ज्यामुळे तिचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. अशा लेहेंग्यासोबत तुम्ही दुपट्ट्याला पिन करू शकात. जेणेकरून तुम्हाला गरबा खेळताना कोणतीही अडचण येणार नाही.
या लेहेंग्यात तुमच्या आवडीनुसार मेकअप आणि हेअरस्टाइल ठेऊ शकता. हा लेहेंगा खूपच भारी आहे, त्यामुळे हलका मेकअपही त्याच्यासोबत चांगला दिसेल. या लेहेंग्यात हिरवे वर्क असल्यामुळे तुम्ही सोबत हिरवे दागिनेही कॅरी करू शकता. लेहेंग्यासोबतच तुम्ही केसांमध्ये स्लीक बन बनवू शकता आणि गुलाब लावू शकता.यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसाल.
साराचा हा लेहेंगा जरी जुन्या साड्यांचा वापर करून बनवला गेला असला तरी बाजारातही असा लेहेंगा तुम्हाला मिळेल. बहुरंगी लेहेंगा सध्या ट्रेंडमध्ये आहे. गरबा नाइटला या प्रकारचा लेहेंगा घालू शकता. यासोबत बॅकलेस चोली बनवा, जेणेकरून तुमचा लूक हटके आणि सुंदर दिसेल.
जर तुम्ही सारा अली खानसारखा लेहेंगा घातला असेल तर त्यासोबत तुमच्या गळ्यात चोकर घाला. कानातील झुमके तुमचे सौंदर्य वाढवतील. गुलाबी शेड मेकअपसह तुम्ही हा लेहेंगा लुक पूर्ण करू शकता. तुम्ही केस मोकळे किंवा बनव बनवून बांधू शकता.
गरबा नाईटसाठी जान्हवी कपूरचा बहुरंगी लेहेंगा तुमच्या सौंदर्यात भर घालण्यास मदत करेल. या लेहेंग्यावर खूप भारी हातकाम आहे. तिने सोबत घेतलेल्या ब्लाउजला गोड नेकलाइन होती, ज्यामुळे ब्लाउज देखील सुंदर दिसत आहे. या बहुरंगी लेहेंग्याने तुम्ही हेवी आय मेकअप करू शकता. रंगीत दागिने तुमच्या सौंदर्यात भर घालेल. तुम्ही तुमच्या केसांचा बन बनवू शकता. यामुळे तुमचा लूक क्लासी दिसेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.