Navratri Colour 2024: आज नवरात्रीचा शुभ रंग लाल, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिटची आयडिया, सर्वजण करतील कौतुक

Navratri 2024 Colour: आज नवरात्रीचा सहावा दिवस असून शुभ रंग लाल आहे. तुम्हाला आज स्टायलिश आणि सुंदर दिसायचे असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून आउटफिटची आयडिया घेऊ शकता.
Navratri 6th  Day Colour:
Navratri 6th Day Colour:Sakal
Updated on

Navratri 6th Day Colour: देशभरात शारदीय नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत आहे. सर्वत्र भक्तीमय आणि मंगलमय वातावरण आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी खास रंग निवडण्यात आला आहे. नवरात्रीच्या साहव्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतिक मानला जातो. मातेला लाल रंगाची साडी किंवा ओढणी अर्पण करणे शुभ मानले जाते.

तुम्हाला आज लाल साडीत क्लासी, सुंदर आणि मराठमोळा लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून कल्पना घेऊ शकता. तुम्हा हा लूक कॅरी करून ऑफिस किंवा कोणत्याही कार्यक्रमांमध्ये जाऊ शकता. तुमचा लूक पाहून सर्वजण तुमचे खुप कौतुक करतील.

Sakal

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी साडी परिधान करायची असेल तर मराठी अभिनेत्री तेजस्वी प्रधानसारखा लूक कॅरी करू शकता. तेजस्वी लाल साडीत खुप सुंदर दिसत आहे. तुम्ही लांब बाहीचे ब्लाऊज घालू शकता. हातात हिरव्या बांगड्या आणि दागिन्यासह लूक पूर्ण करू शकता. तसेच मराठमोळ्या लूकसाठी नाकात नथ घालू शकता. तसेच लाइट पिंक मेकअप करून तुम्ही अधिक सुंदर दिसू शकता.

Navratri 6th  Day Colour:
Navratri Colour 2024: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी 'या' रंगाचे परिधान करा कपडे, देवी स्कंदमाता होईल प्रसन्न
Sakal

आजचा शुभ रंग लाल आहे. तुम्हाला लाल साडी नेसायची असेल तर मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीसारखा लूक करू शकता. तुम्ही लाल रंगाची काठापदकाची साडी नेसू शकता. कानात झुमके, गळ्यात दागिने आणि हातात हिरव्या बांगड्या घालू शकता. तुम्ही केस मोकळे ठेऊ शकता किंवा हेअर स्टाइळ करू शकता. हा लूक कॅरी करून तुम्ही ऑफिसला देखील जाऊ शकता.

Sakal

प्रिया बापट या साडीच खुप सुंदर दिसत आहे. तिने लाल रंगाची साडी नेसली असून हिरव्या ब्लाऊजसह हा लूक पूर्ण केला आहे. हा सिंपल लूक असून तुम्ही यामध्ये खुप सुंदर दिसू शकता. हा लूक ऑफिससाठी परफेक्ट आहे. तुम्ही लाइट मेकअप देखील करू शकता. तुम्ही हेअर स्टाइल करू शकता किंवा मोकळे ठेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.