Navratri 2024: शारदीय नवरात्रीत माता दुर्गेच्या 9 रूपांना 'हे' पदार्थ करा अर्पण, संकट होतील दूर

Navratri 2024: शारदीय नवरात्र ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या 9 रूपांची मनोभावे पूजा केली जाते. या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या हे जाणून घेऊया.
Navratri 2024:
Navratri 2024: Sakal
Updated on

Navratri 2024: पितृपक्ष संपताच शारदीय नवरात्री सुरू होणार आहे. यंदा ३ ऑक्टोबरला नवरात्री साजरी केली जाणार आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव माता दुर्गाला समर्पित आहे. नवरात्रीत ९ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसामध्ये देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. शारदीय नवरात्रीमध्ये नऊ देवींना आवडते नैवेद्य अर्पण केल्यास माता प्रसन्न होते. अशा परिस्थितीत कोणत्या दिवशी कोणता भोग अरप्ण करावा हे जाणून घेऊया.

दिवस पहिला

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करण्याची परंपरा आहे . गाईच्या तुपापासून बनवलेला हलवा आणि रबरी आई शैलपुत्रीला अर्पण करा.

दिवस दुसरा

शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी मातेला समर्पित आहे. ब्रह्मचारिणीला नैवेद्यात साखर आणि पंचामृत या गोष्टीचा समावेश करावा. यामुळे व्यक्तीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते.

दिवस तिसरा

शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेला समर्पित आहे. चंद्रघंटा मातेला दुधापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावे . त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात.

दिवस चौथा

शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. कुष्मांडा मातेला मालपुआ अर्पण करावा. यामुळे कुष्मांडा मातेचा आशीर्वाद कायम राहतो.

दिवस पाचवा

पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. माता स्कंदमातेला केळी अर्पण करावे. यामुळे व्यक्तीच्या व्यवसायात आणि करिअरमध्ये प्रगती होते.

Navratri 2024:
Shardiya Navratri 2024: नवरात्रीत नऊ दिवस काढा देवीची सुंदर पाऊलांची रांगोळी, वाढेल अंगणाची शोभा

दिवस सहावा

शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा मनोभावी पूजा केली जाते. कात्यायनी मातेला मध आणि फळे अर्पण करावे. यामुळे व्यक्तीला ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त होते.

दिवस सातवा

नवरात्रीच्या सातव्या दिवशी शारदिया माता कालरात्रीला समर्पित केली जाते. कालरात्रीला गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करावे. यामुळे संकट दूर होतात.

दिवस आठवा

शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावे. हे करणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

दिवस नऊ

शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते. माता सिद्धिदात्रीला पुरी, खीर किंवा हलवा अर्पण करावा. यामुळे तुमच्यावर माता देवीचा आशीर्वाद कायम राहील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.