Navratri 2024 : नवरात्रीचा सहावा दिवस अशी करा माता कात्यायनीची पूजा, देवीसमोर वाचा पौराणिक कथा

Navratri 2024 : महर्षी कात्यायन यांनी सर्वप्रथम देवीची पूजा केली. या कारणास्तव तिला कात्यायनी म्हटले गेले.
Navratri 2024
Navratri 2024esakal
Updated on

Navratri :

शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस आज आहे. आजच्या दिवशी सहावे रूप देवी कात्यायनीची विधीवत पूजा केली जाते. अशी धार्मिक मान्यता आहे की कात्यायनी मातेची पूजा केल्याने विवाहाशी संबंधित अडथळ्यांसह अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि संकटांपासून मुक्ती मिळते.

या दिवशी, पूजेदरम्यान, व्रत कथा वाचली पाहिजे. असे न केल्याने शुभ फळ मिळण्यापासून वंचित राहतो, असे मानले जाते. आपण कात्यायनी मातेच्या व्रताची कथा आणि तिचा संपूर्ण पूजा विधी पाहुयात.

Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : महिलांना जटामुक्त करणं, निराधारांना साथ देऊन समाजकार्याचा वसा घेतलेली नवदुर्गा गीता हासूरकर

देवीची कात्यायनीची पौराणिक कथा

कात नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्याचा मुलगा कात्या ऋषी होता. या कात्याच्या कुळात जगप्रसिद्ध महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला. भगवती पारंबाची पूजा करताना त्यांनी अनेक वर्षे अत्यंत कठीण तपश्चर्या केली. त्यांच्या घरी आई भगवतीने कन्या म्हणून जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. माता भगवतीने त्यांची प्रार्थना स्वीकारली.

काही काळानंतर जेव्हा पृथ्वीवर महिषासुर राक्षसाचा अत्याचार वाढला तेव्हा भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या शक्तीचा एक भाग देऊन महिषासुराचा नाश करण्यासाठी देवीची निर्मिती केली. महर्षी कात्यायन यांनी सर्वप्रथम देवीची पूजा केली. या कारणास्तव तिला कात्यायनी म्हटले गेले.

महर्षी कात्यायन यांच्या कन्या म्हणून तिचा जन्म तेथे झाला अशीही एक कथा आहे. आश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेतल्यानंतर त्यांनी शुक्त सप्तमी, अष्टमी आणि नवमी असे तीन दिवस कात्यायन ऋषींची पूजा केली आणि दशमीला महिषासुराचा वध केला.  

Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत करा हे सोपे वास्तू उपाय, विजयादशमीपर्यंत पडेल फरक

 नवरात्री पूजा विधी

सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवीची प्रतिमा पाटावर मांडून तिला लाल रंगाची चुनरी, पिवळ्या रंगाचे फुल, तीन पिवळी हळकुंडे अर्पण करावी. तिच्या पूजेत मधाचा वापर केलाच पाहिजे, कारण आईला मध खूप आवडतो. देवी कात्यायिनीला सुपारी देखील मधासह अर्पण केली जाते. कात्यायनी देवीच्या पूजेमध्ये लाल रंगाच्या कपड्यांनाही खूप महत्त्व आहे.  

देवीचे रूप कसे आहे

देवी चार भुजा रुपी आहे. देवीच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळ पुष्प आहे. तर दुसऱ्या हातात अभयमुद्रा आणि वर मुद्रा केलेल्या रुपात आहेत. देवीचे शरीर सोन्यासारखे पिवळे आहे. तिचे वाहन सिंह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.