Navratri 2024 : नवरात्रीचा सातवा दिवस, अशी करा माता काळरात्रीची पूजा, होईल मृत्यूचे भय दूर

दुर्गेचे हे रूप रणांगणात उतरून राक्षसांचा विनाश करणारे आहे.
Navratri kalratri devi
Navratri kalratri devi esakal
Updated on

 Navratri 2024 :  

आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवसाला महासप्तमी असेही म्हणतात. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. माता दुर्गेच्या नऊ अवतारांपैकी देवी कालरात्रीला सर्वात क्रोध असणारी देवी मानली जाते. कारण जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढते तेव्हा देवी राक्षसांचा नाश करण्यासाठी कालरात्रीच्या अवतारात येते.

देवी कालरात्रीला रात्रीची देवी देखील म्हटले जाते. परंतु देवी कालरात्री फक्त दुष्टांचा वध करते. असं म्हटलं जातं की, कालरात्रीची पूजा करणाऱ्या कोणत्याही भक्ताला अकाली मृत्यूचा धोका नाही. चला, जाणून घेऊया नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची विशेष पूजा पद्धत, नैवेद्य आणि महत्त्व.

Navratri kalratri devi
Navratri 2024: रेणुका देवीचा मंदिर परिसर उत्सवासाठी उजळला, दीडशे वर्षांची परंपरा

माता काळरात्रीची पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, एकेकाळी शुंभ, निशुंब,रक्तबी यांसारख्या दुष्ट राक्षसांनी भूतलावर उच्छाद केला होता. लोकांसह देवांनाही त्रास दिला होता. बघेल त्याला उचलणे, मारणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता. त्यामुळे वैतागलेले देव गण भगवान शंकरांचा धावा करू लागले.

जेव्हा भगवान शंकरांकडे देव गेले, तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असे सांगितले. देवीने महिषासुर रूप धारण करून राक्षसाचा वध केला. पण त्या राक्षसाच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली. तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी माता काळरात्रीची निर्मिती पार्वती मातेने केली.

Navratri kalratri devi
Navratri 2024: नवरात्रीत अष्टमी अन् नवमीला 'या' 5 वस्तू करा खरेदी, घरात कायम राहील सुख-समृद्धी

या रक्तबिजातून निर्मित झालेल्या राक्षसांचे मुख धडावेगळे करून त्यातून येणारे रक्त कालीमातेने प्राशन केले. त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध केला. (Navratri 2023)

 

काळरात्री मातेची पूजा कशी करावी

सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घाला. मातेच्या मूर्ती, प्रतिमेला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घाला. देवीला लाल रंगाचे कपडे अर्पण करावेत. देवीला फुले अर्पण करून तिथे दिवा लावावा. शेवटी देवीच्या मंत्राचा जाप करून देवीची आरती करावी.

देवीचा मंत्र- ‘ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै ऊं कालरात्रि दैव्ये नम:।’

Navratri kalratri devi
Navratri 2024 7th Colour: आज नवरात्रीचा शुभ रंग निळा, स्टायलिश लूक हवा असेल तर या अभिनेत्रींकडून घ्या आउटफिटची आयडिया

मातेला कोणता रंग आवडतो

दुर्गेचे हे रूप थेट मैदानात उतरून राक्षसांचा विनाश करणारे आहे. त्यामुळे देवीच्या या रूपाला रक्तासारखा लाल भडक रंग जास्त आवडतो. त्यामुळे देवीची पूजा करताना लाल कपडे परिधान करा. तसेच देवीला लाल रंगाची फुले अर्पण करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.