नवरात्री म्हणजे नऊ दिवस, नऊ माळा अशी भाविकांची समजूत आहे. नऊ दिवस व रात्रीचा कुळाचार असा या शब्दाचा अर्थ नव्हे तर अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत केले जाणारे कर्म म्हणजे घटस्थापना. नंदादीप म्हणजे नवरात्र असा अर्थ धर्मसिंधुकारांनी दिला आहे. त्यामुळे दिवस आठ की नऊ हा प्रश्नच उद्भवत नाही,असे सूरज केवट (ज्योतिर्विद) यांनी सांगितले.
नवरात्रात अनेक जण रोज उपवास करतात, असा उपवास महानवमीच्या दिवशी सकाळी नवरात्रोस्थापन होईपर्यंत करावा. त्यानंतर महानवमीच्या दिवशी उपवासाचे पारणे करावे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी सुतक आले व महानवमीपूर्वीच सुतक संपत असेल तर त्यानंतर सात, पाच, तीन अथवा एक दिवस जेवढे दिवस मिळतील तेवढेच दिवस नवरात्र करावे असे जाणकार सांगतात.
दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार : शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.
दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं : अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.
‘नऊ’ देवस्थानं : वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबाजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला).
नवरात्रींचे ‘नऊ’ रंग : लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.
नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा : रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.
नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं : माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य, पीतवर्ण-मणी.
‘नऊ’ प्रकारची दानं : अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.
नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार : श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.
प्रसिद्ध ‘नऊ’ नाग : शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.
पृथ्वीचे नवखंड : भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).
मानवी देहांतर्गत ‘नऊ’ कोश : अन्नमय, शब्दमय, प्राणमय, आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय, आकाशमय, विज्ञानमय.
मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म : धैर्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.
शरीराच्या ‘नऊ’ अवस्था : मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू.
नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं : आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथुन, मंत्र, औषध, दान, मान, अपमान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.