आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. माता दुर्गेचे तिसरे रूप म्हणजे देवी चंद्रघंटा होय. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. माता चंद्रघंटाचे हे रूप अतिशय सुंदर, मोहक, अलौकिक, कल्याणकारी आणि शांती देणारे आहे.
चंद्रघंटा मातेच्या कपाळावर एक अर्धचंद्र असतो. त्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की देवी माता तिच्या भक्तांवर प्रसन्न होते आणि त्यांना शांती आणि समृद्धी देते. (Navratri 2024)
पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट अन् चांगल्या वृत्तींचे युद्ध होत आले आहे. हे आपल्यासाठी काही नवे नाही. वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात अन् त्यांचा विनाश करतात. अशाच प्रकारे माता चंद्रघटेचा जन्म झाला.
पौराणिक कथेनुसार, महिषासुर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देलोकावर हल्ला केला. त्यानंतर महिषासुर आणि देवतांमध्ये घनघोर युद्ध झाले. जेव्हा देव हरायला लागले तेव्हा ते मदतीसाठी ब्रह्मा विष्णू अन महेशांकडे धावत आले.
देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले. त्यावेळी माता चंद्रघटाच या राक्षसाचा वध करतील. असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघटेची निर्मिती केली. भगवान शंकरांनी मातेला त्रिशूळ, भगवान विष्णूने चक्र, देवराज इंद्राने घंटा, सूर्यदेवांनी धारदार तलवार आणि वाघावर स्वार केले. तसेच इतर देवी-देवतांनीही मातेला शस्त्रे दिली.
मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला. अशाप्रकारे, देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या.
पुराणानुसार, जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते केसात अनेक साप, पिशाच्च, अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले. ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडली. त्यानंतर पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले आणि शिव पार्वतींचा विवाह झाला. (Chandraghata Mata)
पिण्डज प्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता
प्रसादं तनुते मह्मम् चंद्रघण्टेति विश्रुता
या ऊं देवी चंद्रघण्टायै नम:
चंद्रघटा मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच, देवीला खीरही अर्पण केली जाते.
मातेला नैवेद्य दाखवल्यानंतर दुधाचेही दान करता येते. ब्राह्मणाला भोजन देऊन त्यांना दक्षिणा द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.