नवरात्रीत दुर्गा मातेच्या नऊ अवतारांची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. यावेळी नवरात्रीचा आठवा दिवस आज म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी आहे. आज माता महागौरीची विशेष पूजा केली जाईल.
पूजेदरम्यान माता महागौरी व्रताचे पठण अवश्य करावे. माता महागौरीच्या व्रताचे, पौराणिक कथेचे वाचन केल्याने साधकाला वाईट पापांपासून मुक्ती मिळते आणि शुभ फल प्राप्त होते असे मानले जाते. माता महागौरी व्रताची कथा आणि पूजा विधी जाणून घेऊयात.
काली रूपातील मातेचे काळे पडलेले शरीर पाहून भगवान शंकरांनी तिची चेष्टा केली. ती चेष्टा मातेला सहन झाली नाही.तेव्हा पार्वती माता तपश्चर्या करू लागली. अनेक वर्ष लोटली तरी पार्वती माता परतली नाही. मातेच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी मातेला हिमालयातील सरोवरात स्नान करावे. मातेने तसे केले अन् मातेची कांती चंद्रापेक्षाही अधिक सुंदर झाली.
दुसऱ्या एका कथेनुसार, भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी, देवीने कठोर तपश्चर्या केली होती. ज्यामुळे त्यांचे शरीर काळे पडले होते. देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव तिचा स्वीकार करतात आणि भगवान शिव तिचे शरीर गंगाजलाने अभिषेक घातला, त्यानंतर देवी तेजस्वी बनले. आणि तेव्हापासून तिचे नाव महागौरी पडले.
माता महागौरीची यथायोग्य पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि भक्ताला सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक सिद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. माता महागौरी देखील साधकाच्या मनातील संभ्रम दूर करते.
श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः। महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।
देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।