Navratri 2024 : शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी आहे देवी कुष्मांडाला मान, अशी करा तिची पूजा

शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस माता कुष्मांडाला समर्पित आहे. कुष्मांडा माता सिंहावर स्वार होते.
Navratri 2024
Navratri 2024 esakal
Updated on

 Mata Kushmanda devi :

शारदीय नवरात्रौत्सवाला उत्सहात प्रारंभ झाला आहे. आज शारदीय नवरात्रौत्सवाचा चौथा दिवस आहे. आजच्या दिवशी दुर्गा मातेच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते. देवीचे हे रूप कसे आहे, कुष्मांडा मातेची पूजा कशी करावी याबद्दल अधिक माहिती घेऊयात.

शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस माता कुष्मांडाला समर्पित आहे. कुष्मांडा माता सिंहावर स्वार होते. कुष्मांडा देवीची उपासना केल्याने दु:ख आणि दारिद्र्य दूर होते,अशी मान्यता आहे. देवीची पूजा केल्याने सुख प्राप्त होते. (Navratri 2024) 

Navratri 2024
Nashik Navratri 2024 : आदेश झुगारून रात्री दहानंतरही दणदणाट; दांडिया आयोजकांची मनमानी

पुराणानुसार देवी दुर्गेच्या चौथ्या रूपाला कुष्मांडा म्हणतात. कुष्मांडा आईला आठ हात आहेत. आईने एका हातात जपमाळ धरली आहे आणि उर्वरित सात हातात धनुष्य, बाण, कमळ, अमृताने भरलेले भांडे, कमंडल, चक्र आणि गदा आहे.

कुष्मांडा देवीची कथा

या देवीची ठोस अशी कथा उपलब्ध नाही. पण, पुराणातील उल्लेखानुसार जेव्हा ब्रह्मांड अस्तित्वात नव्हतं. तेव्हा त्याच्या निर्मितीसाठी मातेचा जन्म झाला. देवीने सुर्य, ग्रहांनी बनणारी आकाशगंगा तयार केली. जगाची निर्मिती करणारी अशी ही कुष्मांडा देवी आहे.

कुष्मांडा देवी हे देवीचे मूळ स्वरूप आहे. विश्वाची निर्मिती करणार ती मूळ शक्ती आहे. ही देवी सूर्यमालेत निवास करते. सुर्यदेवांच्या जवळ जाण्याची शक्ती तर देवांमध्येही नाही. पण माता कुष्मांडाचे निवासस्थान हे सुर्यदेवच आहेत.

Navratri 2024
Navratri 2024: भारतातील 'या' प्रसिद्ध माता दुर्गा मंदिरांना एकदा नक्की भेट द्या,सर्व मनोकामना होतील पूर्ण

कुष्मांडा मातेला कोणता नैवेद्य प्रिय आहे

या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केल्यानंतर तिला मालपुवा अर्पण केला जातो. मंदिरात हा प्रसाद वाटणे देखील या दिवशी शुभ आहे. या दिवशी मातेला मालपुवा अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

कुष्मांडा मातेचा मंत्र

या देवी सर्वभू‍तेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता.
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः.

Navratri 2024
Navratri 2024 : नवरात्रोत्‍सवातील पूजा साहित्याच्या दरात वाढ; बाजारपेठेत गर्दी : चौका-चौकांत मंडळांकडून सजावट

कुष्मांडा देवीचे आवडते फूल आणि रंग

माता कुष्मांडाला लाल रंग आवडतो, म्हणून तिला पूजेमध्ये जास्वंद, लाल गुलाब इत्यादी लाल रंगाची फुले अर्पण करता येतात, यामुळे देवी प्रसन्न होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.