Navratri 2024 : एकट्या महिलांसाठी संघर्ष करायला पुढे मागे न पाहणारी रणरागिणी 'भक्ती'

'विधवा, एकट्या महिलांना मदतीचा हात मिळत नाही, त्यांच्यासाठी आमची संस्था आहे'
Navratri 2024
Navratri 2024esakal
Updated on

Navratri 2024 :

जेव्हा एखाद्या महिलेच्या पतीचे निधन होतं तेव्हा ती महिला खऱ्या अर्थाने एकटी पडते. अशा महिलांना माहेर सासर अशा कोणाचाही साथ मिळत नाही. कारण ज्याला त्याला स्वतःचा संसार आणि भविष्य असतं. अशा गोरगरीब एकट्या महिलांसाठी काम करते ती भक्ती.

स्वतःसाठी लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या महिला अनेक आहेत. त्या प्रत्येकीचा संघर्ष मुलाचाच आहे. पण समाजासाठी आणि संविधानासाठी लढणाऱ्या मोजक्याच. आज आपण  ज्या नवदुर्ग ची गोष्ट पाहणार आहोत ती आहे भक्ती शिंदे. भक्ती श्रीवस्ती संस्थेच्या माध्यमातून विधवा अपंग आणि एकल महिलांना रोजगाराची साधने देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करते.

Navratri 2024
Navratri 2024 : ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवांच्या शक्तींची देवता! तिसऱ्या माळेस सप्तशृंगगडावर आदिमायेच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

मला जेव्हा इतर महिलांचे दुःख कळतं तेव्हा माझं दुःख आपोआप छोट वाटतं, असं भक्ती सांगतात. जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील चढउतार संघर्ष आणि श्रावस्ती संस्थेच्या सकारात्मक कार्याबद्दल.

मी भक्ती शिदे, माझं लग्न झालं त्यावेळी मी सोळा-सतरा वर्षाची होते. आम्ही दोघं पती-पत्नी दोन टोकांच्या विचाराचे होते. स्त्री म्हणून मला फारसे बंधन नव्हते. मला एक मुलगी अन् मुलगा अशी दोन अपत्य झाली. 2012 पर्यंत संसार अगदी आमचं सुरळीत होत 2012 ला आमच्यावर कर्जाचा डोंगर झाला. त्यामध्ये आमचं राहतं घर गेलं. त्यानंतर आमच्या जगण्यात बदल झाले.

अत्यंत हलाकीचे दिवस आले, पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यात मुलांची होणारे वाताहात, दोघांचे मतभेद आणि माहेर आणि सासरकडील लोकांशी असलेल्या संबंधांवर झालेला परिणाम या सगळ्या कारणामुळे मुलाचे शिक्षण नव्हतं. आर्थिक घडी बसवण्यासाठी मुलाने एक छोटी नोकरी पत्कारली.

Navratri 2024
Navratri 2024 : ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवांच्या शक्तींची देवता! तिसऱ्या माळेस सप्तशृंगगडावर आदिमायेच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
महिलांसाठी लघुउद्योग सुरू केले
महिलांसाठी लघुउद्योग सुरू केलेesakal

यानंतर चार वर्ष परिस्थिती जैसे थे होती. याच काळात मला 5000 रूपये फेलोशिप मिळाली. या आधीही फेलोशिपसाठी जाण्याची संधी होती. पण कुटुंब,मुलगी यामुळे मी गेले नाही. कारण, फेलोशिपसाठी मला आठवडाभर बाहेर रहावं लागणार होतं. पण नंतर मिस्टरांनी जबरदस्तीने दोन हजार 2016 ला यासाठी पाठवलं.

मी नसताना पाच दिवस ते मुलीसोबत थांबायचे. काही कारणास्तव जो माणूस तू माझं नाव लावायचं नाही असं सांगत होता तो माणूस ज्या त्या व्यक्तीला जाऊन सांगत होता, ही माझी बायको आहे. दोन वर्ष सुखाचे गेले असावेत, 2019 मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Navratri 2024
Navratri 2024 : भारतातील या मंदिरातील देवीला मद्याचा नैवेद्य का दाखवतात?

हातात एक दमडी नाही छप्पर नाही अर्धवट शिक्षण झालेली दोन्ही मुलं आणि मी एकटी हा प्रवास सुरू झाला. माझ्याकडे असलेल्या सकारात्मक गोष्टींचा मला उपयोग झाला. अशातच मी श्रावस्ती बहुउद्देशीय संस्थेची सुरूवात झाली. २०१९ पासून संस्थेच्या कामकाजाला सुरुवात झाली.

या संस्थेने महिला उद्योजगाता एकल महिला संघटन आणि संविधान प्रचार आणि प्रसार, संस्थेचे ध्येय, संविधान मूल्यानुसार महिला घडाव्या आणि निर्णयाप्रक्रियात याव्या, यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

एकट्या पडलेल्या महिलांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण घेणे.  १०० सेंद्रिय परसबागेची निर्मिती केली आहेत. संविधान व मुल्यावर आधारित कार्यशाळा घेणे, कापडपासून विविध वस्तु बनवणे ,इत्यादि उपक्रम आहेत.

मी स्वतः एकल महिला असून स्त्री म्हणून अनेक गोष्टीना तोंड  देत असताना अनेक प्रश्न पुढे आलेत. तिला स्वतःच दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. एकल महिलानी स्वताच्या पायावर उभा राहील पाहिजे या साठी संस्था म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करते.

आमच्या  संस्थेतर्फे लहान मुलांचं मसाज सेंटर, छोटे हॉटेल , खानावळ, कापडी पिशवी बनवणे ,मसाले तयार करणे, उन्हाळी पदार्थ बनवणे, घरगुती कपडे बनवणे , टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे. पंचकर्म केंद्र, काही महिला आमच्याकडे गोधड्या बनवतात आमच्या गोधड्या अमेरिकेला गेली असून बैजुनाथ मंगेशकर सरिता ताई  आव्हाड ,आनंद करेंदीकर , सुलेखा तळवरकर यांच्या दिल के करिब  कार्यक्रमात यांच्यापर्यंत पोहाचल्या आहेत.

मी सामाजिक काम करत असताना फक्त एकच गोष्ट माझ्या पुढे होती. ती म्हणजे मुलांचे शिक्षण. मुलांना उच्चशिक्षित केलं की आमची परिस्थिती बदलेल, असे मला वाटायचे. मुलांनीही त्या गोष्टीची जाण ठेवली. सध्या माझा मुलगा पुण्यात मोठ्या पोस्टवर नोकरीला आहे. तर मुलगीही एमबीएचे शिक्षण घेत आहे. 

Navratri 2024
Navratri 2024: भारतातील 'या' प्रसिद्ध माता दुर्गा मंदिरांना एकदा नक्की भेट द्या,सर्व मनोकामना होतील पूर्ण

आमच्या ही संस्था लोकसहभागातून चालते. आजपर्यंत संस्थेचया माध्यमातून रंगतसंगत प्रतिष्टान,पुणे, भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्टान वसई, व महिला बालकल्याण अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला आहे.

समाजातील नवऱ्याने टाकलेल्या, विधवा महिलांना भक्ती सांगते की, अशा महिलांनी खचून न जाता मोठ्या धैर्याने पुढे जावे. कुणाही पुढे हात न पसरता स्वत:च्या पायावर उभं रहावं. अशा महिलांना कसलीही मदत लागली तर आमची संस्था ती कमी भरून काढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.