शारदीय नवरात्रीत 9 दिवस लोक उपवास करतात. नऊ दिवस दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मातृशक्ती आणि भक्ती अशी आहे की 9 दिवस उपवास केल्याचेही कळत नाही. उपवासात फळांचे सेवन अधिक करावे असे सांगितले जाते. जे लोक 9 दिवस उपवास करतात ते सहसा अशा पदार्थांचे सेवन करतात ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते.
जर तुम्ही वजन कमी होईल या अपेक्षेने व्रत करत असाल. तर त्यांचे काही नियम तुम्ही पाळले पाहिजेत. हे नियम पाळले तर या 9 दिवसात उपवास करूनही वजन कमी करू शकता. यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे. अशा गोष्टींचा आहारात समावेश करा, ज्यामुळे लठ्ठपणा झपाट्याने कमी होईल. (Navratri Vrat)
उपवासात काही लोक फराळ करतात. तर काही लोक कडक उपवास करतात. काही लोक श्रद्धा म्हणून उपवास करतात तर काहींना वजन कमी करायचे असते त्यामुळे उपवास करतात. तुम्ही अशा गोष्टींचा आहारात समावेश करा, ज्यामुळे वाढलेलं वजन झपाट्याने कमी होईल. तर असे पदार्थ कोणते हे पाहुयात.
उपवासात वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करा. दिवसाच्या सुरुवातीला सकाळी 1 सफरचंद खा. यामुळे दिवसभराची ऊर्जा मिळेल. यानंतर केळी, पपई, पेरू, संत्री या फळांचे सेवन करा.
फळे खाल्ल्याने शरीराला फायबर आणि भरपूर ऊर्जा मिळते. फळांमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे पोट भरते आणि ऊर्जा मिळते. पाणीदार फळे वजन कमी करण्यास मदत करतात. दिवसातून एक फळ खाण्याची खात्री करा.
दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी सकाळी एक नारळ पाणी प्या. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल. नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. यामुळे शरीरात ऊर्जा येते आणि रिकाम्या पोटी पोटात गॅस, ॲसिडीटी आणि जळजळ होण्याच्या समस्या दूर होतात.
नवरात्रीच्या उपवासात शरीराला ताकद लागते. जे लोक 9 दिवस उपवास करतात त्यांनी दररोज मूठभर सुका मेवा खावा. सुका मेवा शरीराला ऊर्जा देईल आणि आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण करेल. उपवासात तुम्ही काजू, बदाम, मनुका, अक्रोड आणि खजूर खाऊ शकता. यामुळे फायबर मिळेल आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. लाडू बनवून सुका मेवाही खाऊ शकता.
उपवासाच्या वेळी तुम्हाला द्रवपदार्थाच्या सेवनाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. यासाठी आहारात दही आणि ताक यांचा समावेश करा. दही खाण्याऐवजी ताक किंवा लस्सी बनवून प्यावे. तुम्ही जिरे आणि खडे मीठ मिसळून ताक पिऊ शकता. दिवसातून एकदा लिंबू पाणी आणि जलजीरा किंवा दूध प्या. यामुळे पोट भरेल आणि भूकही कमी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.