Navratri 2024 : आई अन् बहिणीच्या पाठबळावर मोना बनली 'जंगलाची राखणदार', वाचा तिचा थक्क करणार प्रवास

Navratri women's success story : मोना सध्या वन विभागामध्ये आर.एफ.ओचे तामिळनाडू येथे ट्रेनिंग घेत आहे. तिच्या या प्रवासाबद्दल मोनाकडूनच जाणून घेऊयात.
Navratri 2024
Navratri 2024 esakal
Updated on

 Navratri :

समाजात अशा अनेक मुली,तरूणी आहेत. ज्या काहीतरी करू पाहतात. लोक सेवा आयोगाच्या परीक्षा पास होण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतात. पण, अशा परीक्षा पास होऊन अधिकारी बनणं काही सोप्पी गोष्ट नाही. तरीही सातत्यान प्रयत्न करून ‘जंगलाची राखणदार’ बनलेल्या तरूणीची ही गोष्ट. (Navratri 2024)

जंगल हे क्षेत्र असं आहे जिथे एखाद्या महिलेने जाण्याचा विचार करणे थोडे अवघड. त्यापेक्षाही त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कुटुंबाने प्रोत्साहन देणं तसं दुर्मिळच. पण सर्व सामान्य घरातील जन्म, अशातच वडिलांचे छत्र हरपलेल्या घरामध्ये आई, मोठी बहीण आणि करता पुरुष असा कोणीच नाही.

मात्र अशातही आई व बहिण तिच्या पाठीशी राहिली तिला आधार दिला तिला खंबीर बनवली. आणि या पाठबळाच्या जोरावरच ती बनली आहे जंगलाची राखणदार. या असामान्य व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे मोना बेलवलकर. मोना सध्या वन विभागामध्ये आर.एफ.ओचे तामिळनाडू येथे ट्रेनिंग घेत आहे. तिच्या या प्रवासाबद्दल मोनाकडूनच जाणून घेऊयात.

Navratri 2024
Navratri: आदिमायेच्या शक्ती, भक्तीच्या संगमाच्या चैतन्यपर्वास सुरुवात! सप्तशृंगगडावर पहिल्या माळेला पंचामृत महापूजा, विधिवत घटस्थापना

कोल्हापुरालगत असलेल्या जयसिंगपूर गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात मी जन्मले. माझ्या जन्माचा काळ असा होता की एका घरात दोन मुली खपणं अवघडच. पण तरीही मी भाग्यवान होते की,  ज्या घरात मुलीचं खूप जल्लोषात स्वागत होत,अशा घरात जन्म झाला. माझी मोठी बहिण होती तरीही माझ्या वडिलांना घरात दुसर अपत्य ही मुलगीच हवी होती. 

माझी आई वैद्यकीय खात्यामध्ये नोकरीस होती. तर वडील एका विमा कंपनीचे एजंट म्हणून काम करायचे. त्यामुळं घरी आईचा तिचा सहवास आम्हाला खूप कमी वेळा मिळायची. वडिलांनी देखील तितक्याच जबाबदारीने आमचा सांभाळ केला.

शुटींगचे ट्रेनिंग घेताना
शुटींगचे ट्रेनिंग घेतानाesakal
Navratri 2024
Navratri 2024: नवरात्रीत नारळाचे करा 'हे' सोपे उपाय, मेहनतीचे योग्य फळ मिळेल

लहानपणापासून "तू मुलगी आहेस, आणि तू हे करायचं नाहीस", अस कधीच ऐकावं लागलं नाही. तू तर मुलांना लाजवशिल एवढी कर्तृत्ववान आहेस, असे संस्कार झाले. या संस्कारमुळेच लहानपणापासून तबला वाजवणे. त्वायकांदो खेळणे, बाईक्स चालवणे असे मुलांच्या नावावर कोरलेल्या गोष्टी करण्यास कायम घरच्यांनी पाठिंबा दिला.

शाळेत स्कॉलरशिप आणि एमटीएस गणित प्रावीण्य या सारख्या स्पर्धामध्ये मी दाखवलेली चुणूक बघून वडिलांनी मी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं. लहानपणापासून  मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे व्याख्यान माला ऐकायला न्यायचे. अभ्यासा मधील हुशारी ,माझी उर्जा आणि उत्साह घरच्यांनी बरोबर ओळखला.

त्यांनी शाळेनंतर मिळणारा माझा वेळ सुधा बरोबर सत्कारणी लावला. सहावी पासून मी तबला शिकू लागले. वैशिष्ट म्हणजे या क्लासमध्ये एकही मुलगी नसायची. पण म्हणून त्यांनी मला कधीच शिकण्यास नकार दिला नाही. उलट सक्षम बनवलं. दहावीपर्यंत कला, क्रीडा, अभ्यास अशी चोहो बाजूने यशप्राप्ती सुरूच होती.

जंगलाची सफर करताना मोना बेलवलकर
जंगलाची सफर करताना मोना बेलवलकर

अकरावीत मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला अन्  काळाने घाला घातला. अचानक एके दिवशी वडिलांचं निधन झालं. आयुष्य पूर्ण बदलून गेलं. आता कुटुंबात आम्ही फक्त तिघी, मी माझी आई आणि दीदी राहिलो. आई माझी खूप खंबीर. वडील गेल्यानंतर तिने पूर्ण ताकदीनिशी आम्हाला साथ दिली. वडील गेल्या नंतर कोणीच नातेवाईक आपले नसतात हे कळून चुकल होतं. सगळी माणसं त्यांचे खरे रंग दाखवत होते. आता आयुष्यात उरले होते ते दोनच लोक, आई आणि दीदी.

या दोन वाघिणी कायम माझ्या पाठीशी होत्या. त्यांनी मला  NCC मध्ये जाऊ दिलं.खडतर प्रशिक्षण घेतलं. आणि तिथे All India Thal Sainik Camp, Delhi येथे कास्य पदक देखील मिळालं. केमिस्ट्रीमधून पदवीचे शिक्षण घेत असताना NCC, Youth festival अशा विविध स्पर्धा मध्ये भाग घेतला.

Navratri 2024
Navratri 2024 : नवरात्रीच्या उपवासात सतत पोटात कावळे ओरडायला लागतात?, या गोष्टी पाळा अन् भुकेला टाळा

अभ्यासा व्यतिरिक्त या गोष्टींमध्ये नेहमी भाग घेणं मला आवडायचं. त्यामुळं व्यवहारज्ञान, संवाद कौशल्य , आत्मविश्वास अशी अनेक कौशल्ये वाढत होती. तर अशा पद्धतीने पदवी पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळले.एव्हाना बहिणीच लग्न झालं होतं.

आईला सोडून पुण्या सारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करन मला पटत नव्हत. त्यामुळं मी घरीच अभ्यासाला सुरुवात केली. काही दिवस कोल्हापूर मध्ये अभ्यास केला. म्हणावं तस यश पहिल्या प्रयत्नांत आले नाही. त्या नंतर दुसरा प्रयत्न केला. त्याचा निकाल कोरोना काळापासून रखडला. मध्यंतरी दोन वर्ष परीक्षा झाल्या नाहीत. त्या दरम्यान शाळेमध्ये मुलांना शिकवण्याच  काम केलं.

Navratri 2024
Nashik Navratri 2024 : श्री कालिकादेवी नवरात्रोत्सव दुसऱ्या माळेला दर्शनासाठी गर्दी! पेड दर्शनाविरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

वर्षभराने निकाल आला. पूर्व परीक्षा पास झाले होते. आता मुख्य परिक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात जायचं ठरवलं. अभ्यास खूप केला, पण मुख्य परीक्षा पास झाले नाही. लगेच पुढे वन सेवेची जाहिरात आली. आता यात मन लावून अभ्यास करायचं आणि post मिळवायची हे मनाशी पक्क बांधल होत.

सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत लायब्ररीत बसून अभ्यास करायचे. खूप मनापासून अभ्यास केला. त्या काळात फोनही बंद केला. घरचे कार्यक्रम, मित्र मैत्रिणी चे भेटणे, सगळे कमी केले... आणि पाठोपाठ अभ्यासाचे फळ मिळत गेले. PSI मुख्य परीक्षा २०२०, वनसेवा मुख्य २०२१ , राज्यसेवा मुख्य २०२१ अशा सगळ्या परीक्षा मी पास होत गेले. आणि तो दिवस आला जेव्हा मी महाराष्ट्र वनसेवा परीक्षेमधून मुलीमधून राज्यात दुसरी आले.

Navratri 2024
Navratri 2024: आज नवरात्रीचा तिसरा राखाडी रंग, माधुरी अन् आलियाकडून घ्या सुंदर लूकच्या आयडिया

आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. आणि राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली. या सगळ्या प्रवासात अनेक कडू-गोड प्रसंग आले. पण या सगळ्या प्रसंगात सोबत होते ते आई आणि दिदी. आज वडील हयात नाहीत. पण त्यांचं स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमान मात्र आहे.

आज मी तामिळनाडू येथील फॉरेस्ट डिपार्टमेंट अतंर्गत ट्रेनिंग घेत आहे. लवकरच मी देशभरातल्या एखाद्या जंगलाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असेन. शेवटी सर्वांना इतकेच सांगेन की,  तुमच्या मुलींच्या पंखांना बळ द्या, मुली खूप उंच भरारी घेतील. सर्वांनी मुलींना शिकवलं पाहिजे, पण अजूनही आमची धडपड मुलींच्या जन्मावरच येऊन थांबते. त्यामुळे मुलींचे स्वागत करा त्यांना शिकू द्या. तरच मुली अवकाशाला  गवसणी घालण्यासाठी मुलीच्या पंखांना बळ द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.