नवरंगांची ट्रेंडी उधळण

भारतीय सण म्हणजे भव्यता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि अर्थातच सुंदर व पारंपरिक आऊटफीट कॅरी करण्याची संधी. प्रत्येक सणाची आपली स्वतंत्र वेशभूषा. नवरात्रोत्सवात तर नवरंगांची मुक्त उधळण होते.
fashion trend
fashion trendsakal
Updated on

- पृथा वीर

भारतीय सण म्हणजे भव्यता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि अर्थातच सुंदर व पारंपरिक आऊटफीट कॅरी करण्याची संधी. प्रत्येक सणाची आपली स्वतंत्र वेशभूषा. नवरात्रोत्सवात तर नवरंगांची मुक्त उधळण होते. प्रत्येक दिवसाचा स्वतंत्र रंग म्हणजे किती कल्पकता. केवळ वेगवेगळ्या साडी नव्हे तर वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा जसे लेहंगा, पंजाबी कुर्ते, कॉटन सूट, पंजाबी सूट असे वेगवेगळे आऊटफीट परिधान करता येतात. दररोजच्या आऊटफीटला साजेशी ज्वेलरी म्हणजे नवीनतम फॅशन ट्रेंड एक्सप्लोर करण्याची उत्तम संधी.

नवरात्रात नऊ दिवसांच्या पोशाखांची तयारी आत्ताच करायला हवी. एकदा आऊटफीटची निवड झाली, की नवरात्राची छान तयारी करता येईल. सुरूवात दुपट्ट्यांनी करता येईल. बांधणीचा दुपट्टा, कोटा डोरिया, चंदेरी, बनारसी, फुलकारी, कॉटन दुपट्टा असे सगळे दुपट्टे वापरता येतील. बनारसी कॉटन सूटवर कोटा डोरिया दुपट्टा छान दिसतो. नवरात्रातील एक दिवस पिवळा बनारसी कॉटन सूट ट्राय करून बघा.

या सूटवर ऑक्सिडाइज्ड झुमके आणि बांगड्या किंवा सिल्व्हर ज्वेलरी छान दिसते. थोडा बदल म्हणून लाल ऑर्गेन्झा सूट छान दिसतो. या आऊटफीटवर गोल्डन झुमके आणि अंबाडा व ज्यूती घालावी, असे स्टाइल एक्स्पर्ट म्हणतात. बनारसी चंदेरी सूटवर कुंदन ज्वेलरी स्टायलिश लूक देते.

ऑर्गेन्झा हँडमेड चिकनकारी सूट किंवा लेहंगा गरबा खेळण्यासाठी छान आहे. चिकनकारीवरचे भरतकाम सुंदर तर दिसते. शिवाय हे फॅब्रिक लाइटलेट असल्याने छान गरबा खेळता येतो. फक्त इतकेच की, ड्रेसवरच्या भरतकामामुळे ॲक्सेसरीज कमीत कमी ठेवा. त्यामुळे पर्ल ज्वेलरी घालता येईल.

फेस्टिवल किंवा कुठल्याही शुभकार्यात लाल रंगाला अधिक महत्त्व आहे. लाल रंगाशिवाय यावर्षी पिवळा, बॉटल ग्रीन, रॉयल निळा आणि पेस्टल रंग नवरात्राच्या फॅशन ट्रेंडमध्ये आहेत. प्रत्येक रंगछटा उत्सवाचे चैतन्य प्रतिबिंबित करतात. चिकनकारी ड्रेसवर मिरर वर्क म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन. रॉयल ब्लू कलरवरच्या लेंहग्यावर मिरर वर्क खूप सुंदर आणि आकर्षक दिसते.

याशिवाय क्लासिक सिल्क साडी नवरात्रातील सर्वोत्तम पर्याय. संपूर्ण लूकसाठी क्लासिक सिल्क साडीमध्ये एक लांब नेकलेस जोडा. साडीवर जाकीट घालणे देखील एक चांगली कल्पना आहे.

स्टायलिस्टच्या फॅशन टीप्स

‘स्टेटमेंट’ दुपट्टे

दुपट्टे हे केवळ ॲक्सेसरी नसून आऊटफीटचे मुख्य सहायक असतात. नवरात्राच्या काळात कॉटन, चंदेरी आणि ऑर्गेन्झा फॅब्रिक निवडा. शिफॉन आणि जॉर्जेट फॅब्रिक्स सुंदरपणे ड्रेप करता येतात. नवरात्रात क्लासिक लेहंगा चोलीशिवाय मजा नाही. लेंहग्यावर रंगबिरंगी खड्यांचे पायातले आणि एकाच रंगाच्या काचेच्या बांगड्या किंवा कडे छान दिसतात. याशिवाय तुम्ही अनारकली सूट वापरून पाहा. फक्त रंग गडद निवडा. अनारकलीसोबत गळ्यात चोकर छान दिसतो.

‘इंडो-वेस्टर्न ग्लॅम’

इंडो-वेस्टर्न ग्लॅम हा नवा ट्रेंड आहे. वेशभूषा पारंपरिक नसली, तरीही वेस्टर्न आऊटफीटवर चांदीचे किंवा ऑक्सिडाइज्ड दागिने घालता येतात.

साडीमध्ये वेस्टर्न, एथनिक, इंडो वेस्टर्न, फ्युजन असे विविध लूक करता येतात. फ्युजन, इंडो वेस्टर्न लुकसाठी साडीच्या डिझाइनऐवजी ब्लाऊजच्या डिझाइनमध्ये अनेक प्रयोग होतात. रेडिमेड ब्लाऊजच्या ट्रेंडमध्ये हायनेक, ऑफ शोल्डर, कोल्ड शोल्डर, स्लीव्हलेस, बॅकलेस, थ्रीफोर्थ, रफल स्लीव्हज ब्लाऊज घेता येतात. साडीबरोबरच कुर्ता-प्लाझो, कुर्ता-स्कर्ट, धोती पॅटर्न, फ्लोरल प्रिंटेड कुर्ता, सिगारेट पॅन्ट अँड लॉंग जॅकेट, वनपीस, क्रॉप टॉप-स्कर्ट हे पॅटर्न आहेत.

बरेचदा आपल्याला हवी तशी फॅशन रेडिमेड ड्रेसमध्ये मिळत नाही. त्यामुळे यंदा जुन्या साडीचा किंवा कापड घेऊन हवा तसा ड्रेस शिवून घेण्याकडे कल वाढला आहे. म्हणजे साडी जुनी असली, तरी एक नवाकोरा हटके ड्रेस तयार होतो. साडीच्या ड्रेसमध्ये शॉर्ट, लॉंग वनपीस, प्लाझो- कुर्ता, प्लाझो-क्रॉप टॉप आणि लॉंग जॅकेट हे ड्रेस आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.