Navratri : पाचवी माळ स्कंदमातेची! माता स्कंदमातेची पौराणिक कथा अन् पूजा विधी!

स्कंदमातेचे हे स्वरूप आहे इतर देवतांपेक्षा वेगळे, अशी करा तिची पूजा
Navratri 
Navratri esakal
Updated on

Navratri 2024 :

 शारदीय नवरात्रीचे वेगवेगळ्या दिवशी जगदंबेच्या वेगळ्या रूपांची पूजाही केली जाते. ही वेगळी रूपं म्हणजे देवीच्या सर्व गुणांची, तिच्या स्वभावाची प्रचिती देणारी आहेत. आज नवरात्रीचा पाचवा दिवस, आजच्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा करण्याची परंपरा आहे. देवीचे हे रूप तिच्या मातृत्वाची जाणिव करून देणारं आहे. म्हणजेच, माता स्कंदमाता एकटी नाही तर तिच्या मांडीवर भगवान कार्तिकेय आहेत.

स्कंदमातेला चार हात आहेत. देवीच्या वरच्या दोन्ही हातात कमळाचे फूल आहे. तर भगवान कार्तिकेय स्कंद त्यांच्या मांडीवर आहेत. असे मानले जाते की स्कंदमातेच्या पूजेच्या वेळी भक्ताने व्रत आणि कथा न केल्यास भक्ताला शुभ फळ मिळत नाही. स्कंदमातेच्या व्रताची कथा काय आहे पाहुयात.

Navratri 
Nashik Navratri 2024 : श्री कालिकादेवी नवरात्रोत्सव दुसऱ्या माळेला दर्शनासाठी गर्दी! पेड दर्शनाविरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

स्कंदमातेची पौराणिक कथा

 पौराणिक कथेनुसार तारकासुर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते. त्याने स्वतःला अमर होण्यासाठी ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले. यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला समजावले की जो जन्म घेईल त्याला मरावेच लागेल.

तारकासुर हे पाहून निराश झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला असे करण्यास सांगितले की तो महादेवाच्या मुलाच्या हातून मरेल. त्याने हे केले कारण त्याला वाटले की भगवान शिव कधीच लग्न करणार नाहीत, मग त्याला मुलगा कसा होईल. त्यामुळे तो आयुष्यात कधीही मरणार नाही.

यानंतर तारकासुराने लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या अत्याचाराने व्यथित होऊन देवी-देवता भगवान शंकरांकडे आले. तारकासुरापासून मुक्ती मिळावी म्हणून देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली.

भगवान शंकरांनी पार्वतीशी विवाह केला आणि ते कार्तिकेयचे पिता झाले. मोठे झाल्यावर कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. स्कंदमाता ही भगवान कार्तिकेयची आई आहे.

Navratri 
Navratri 2024 : ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवांच्या शक्तींची देवता! तिसऱ्या माळेस सप्तशृंगगडावर आदिमायेच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

देवीची पूजा कशी करावी

देवी स्कंदमातेच्या पूजेसाठी, कलशाची स्थापना केलेल्या ठिकाणी स्कंदमातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. तिला फळे, फुले आणि अगरबत्ती अर्पण करा. पंचोपचार पद्धतीने देवी स्कंदमातेची पूजा करणे फार शुभ मानले जाते. देवीला फुले अर्पण करून तिला कुंकू वहावे. आणि मुलाबाळांना सुखी ठेव अशी प्रार्थना करावी.

Navratri 
Navratri 2024: कुरुंदा येथे निसर्गाच्या सान्निध्यात टोकाईदेवी, सात देवींच्या मूर्ती, नवरात्रात भाविकांची अलोट गर्दी

देवीचा आवडता रंग

मातेला पिवळा रंग आवडतो. त्यामुळे देवीला पिवळ्या रंगाची फुले आणि फळे अर्पण करावीत.

 

देवीसमोर या मंत्राचा करावा जाप

या देवी सर्वभूतेषु मां स्कन्दमाता रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

वन्दे वाञ्छित कामार्थे चन्द्रार्धकृतशेखराम्। सिंहरूढ़ा चतुर्भुजा स्कन्दमाता यशस्विनीम्।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.