आज शुक्रवार शारदीय नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस आहे. या दिवशी दुर्गा मातेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची मातेची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. तिच्या तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाते.
'ब्रह्म' शब्दाचा अर्थ तपश्चर्या आणि 'ब्रह्मचारिणी' म्हणजे तपश्चर्या करणारा. ब्रह्मचारिणी देवीची आराधना केल्याने व्यक्तीला त्याच्या सर्व कार्यात विजय प्राप्त होतो. ब्रह्मचारिणी मातेची पूजा करणारा सर्वत्र विजयी होतो. चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा कशी करावी.
पांढरी वस्त्रे परिधान केलेल्या ब्रह्मचारिणी मातेच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. देवीची पूजा केल्याने आपली तपश्चर्याची शक्ती वाढते. कठोर परिश्रमानेच यश मिळू शकते असा संदेश ब्रह्मचारिणी माता आपल्या भक्तांना देते.
नारदमुनींनी उपदेशामुळे माता ब्रह्मचारिणीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली म्हणून तिला तपश्चचारिणी असेही म्हणतात. ब्रह्मचारिणी माता हजारो वर्षे जमिनीवर पडलेली पाने खाऊन भगवान शंकराची पूजा करत राहिली आणि नंतर तिनेही पाने खाणे बंद केले, त्यामुळे तिला अपर्णा हे नाव देखील पडले.
देवी माता आपल्याला प्रत्येक परिस्थितीत कठोर परिश्रम करण्याची आणि कधीही हार न मानण्याची प्रेरणा देते.
आज लवकर उठून स्नान करून देवीची पूजा मांडावी. माता ब्रह्मचारिणीची मूर्ती अगर फोटो असेल तर तो स्वच्छ करावा. माता ब्रह्मचारिणीचा फोटो नसेल तर दुर्गा मातेची मूर्तीही तुम्ही घेऊ शकता. मातेला अक्षता, चंदन, चुनरी आणि लाल फुले अर्पण करा. सर्व देवी-देवतांचा जलाभिषेक करून फळे, फुले व तिलक लावा.
अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावावा. दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करा. सुपारीच्या पानांवर कापूर आणि लवंग ठेवा आणि माता ब्रह्मचारिणीची आरती करा.
महर्षी नारदांच्या उपदेशामुळे हिमालयाची कन्या म्हणून जन्मलेल्या पार्वतीचे मन शंकराच्या प्रेमात पडले आणि भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, म्हणून तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले.
हजारो वर्षे ऊन, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीत जंगलात राहून केवळ फळे आणि फुले खाऊन कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिला तपश्चरिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. तीन हजार वर्षे गळून पडलेली वेलीची पाने खाल्ल्याने आणि नंतर कित्येक हजार वर्षे निर्जल आणि अन्नहीन व्रत पाळल्यामुळे अपर्णालाही देवीचे नाव पडले.
असे केल्यावरच सप्तऋषींनी तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे. आता लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येणार आहेत, म्हणून त्यांच्याबरोबर घरी परत जा आणि योग्य वेळी तुझे लग्न भगवान शंकरासोबत होईल.
ब्रह्मचारिणी मातेला साखर किंवा गूळ अर्पण करा. याशिवाय साखर किंवा गुळापासून बनवलेली मिठाईही देऊ शकता. गूळ किंवा साखर अर्पण केल्याने माता ब्रह्मचारिणी दीर्घायुष्याचा आशीर्वाद देते. याशिवाय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला पांढरी फुले अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः॥
या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
दधाना कपाभ्यामक्षमालाकमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.