Navratri 2024: 'गरबे की रात मे..!' नवरात्रीत दांडिया अन् गरबा खेळताना पायांची कशी काळजी घ्यावी, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Navratri 2024:कधीकधी लोक उत्साहाने गरबा आणि दांडिया करतात परंतु त्यांच्या पायांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे वेदना, सूज किंवा फ्रॅक्चर सारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
Navratri 2024:
Navratri 2024:Sakal
Updated on

Navratri 2024: शारदीय नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे. आज चंद्रघटा देवीची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रीमुळे सर्वत्र भक्तीमय आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्रीचा उत्साह वाढवण्यासाठी गरबा आणि दांडियाचे आयोजन केले जाते. गुजरातमध्ये सर्व वयोगटातील लोक दांडियाच्या तालावर नाचतात. पण आज देशभरात प्रत्येक गावी गरबा आणि दांडिया खेळला जातो. नृत्य आणि संगीताची ही अनोखी परंपरा लोकांना एकत्र जोडण्याचे काम करते.

गरबा आणि दांडियामध्ये, हातांची टाळी किंवा दांडिया पायांच्या बरोबरीची भूमिका बजावते. तालबय नृत्य आणखी सुंदर बनवते. कधीकधी लोक उत्साहाने गरबा आणि दांडिया करतात परंतु त्यांच्या पायांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे वेदना, सूज किंवा फ्रॅक्चर सारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

गरबा खेळताना कोणती काळजी घ्यावी

आरामदायी शूज

गरबा किंवा दांडिया खेळताना आरामदायी शूज घालावे. तुम्ही सपाट आणि सपोर्ट असलेले शूज घालू शकता. गरबा खेळताना पडल्यास दुखापत होणार नाही. हाताचे रक्षण करण्यासाठी बँड वापरावा.

वॉर्म अप

गरबा किंवा दांडिया खेळण्यापूर्वी वॉर्मअप करावे. यामुळे स्नायू ताणले जाणार नाही. तसेच कोणतीही दुखापत होणार नाही. गरबा खेळताना पाय, नितंब आणि पाठीवर जास्त लक्ष द्यावे.

Navratri 2024:
Navratri Fast Recipe: उपवासाला नाश्त्यात बनवा स्वादिष्ट अन् आरोग्यदायी रताळे चाट, लिहून घ्या रेसिपी

स्ट्रेचिंग

स्ट्रेचिंगमुळे स्नायू लवचिक होतात. स्ट्रेचिंग व्यायामामुळे पाय मजबूत होतात, ज्यामुळे तुम्ही दांडियाची प्रत्येक स्टेप सहज करू शकता आणि न थकता गरबा तसेच दांडियाचा आनंद घेऊ शकता.

जर तुम्हाला संधिवात, मधुमेह यासारख्या आरोग्यासंबंधित समस्या असतील तर गरबा खेळण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे तुम्ही गरबा आणि दांडियाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()