Garba Night Makeup: गरबा खेळताना घामाने मेकअप खराब होतोय? मग या टिप्सची घ्या मदत

Garba Night Makeup: सर्व महिला गरबा, दांडिया खेण्यासाठी सुंदर ड्रेस आणि मेकअप करून जातात . पण घामामुळे लूक खराब होऊ शकतो. तुम्ही पुढील गोष्टींची मदत घेतल्यास मेकअप खराब होणार नाही.
Garba Night Makeup:
Garba Night Makeup: Sakal
Updated on

Garba Night Makeup: शारदीय नवरात्रीला ३ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार दुर्गा देवीच्या रूपांची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवसांमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य आणि फुले अर्पण केली जातात. या दिवसांमध्ये गरबा आणि दांडिया खेळला जातो. नवरात्री सुरू होण्याआधीच अनेक लोक गरबा आणि दांडियाची तयारी सुरू करतात. जर तुम्हीही गरबा नाईटला जात असाल तर काही महत्वाच्या मेअप टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा घामामुळे मेकअप खराब होणार नाही.

प्रायमर लावा

गरबा आणि दांडिया खेळताना लूक खराब होऊ द्यायचा नसेल तर प्रायमर लावावा. यामुळे मेकअप एकसारखा दिसतो तसेच घाम आला तरी मेकअप खराब होणार नाही.

लाइट बेस

जर तुम्हाला खुप घाम येत असेल तर हलका बेस वापरा. यामुळे तुमचा मेकअप जास्तवेळ टिकेल. तसेच गरबा आणि दांडिया खेळताना लूक खराब होणार नाही.

वॉटर फ्रुफ काजळ

डोळ्यांसाठी वॉटर प्रूफ काजल, मस्करा आणि लाइनर वापरा. यामुळे काजल, मस्करा आणि लायनर घाम आला तरी पसरणार नाही. तसेच तुमचा गरबा लूक खराब होणार नाही.

मॅट लिपस्टिक

गरबासाठी तयारी करतानामॅट लिपस्टिक वापरावी. बराच वेळ मॅट लिपस्टिक टिकून राहते. यामुळे गरबा खेळायला जात असाल तर मॅट लिपस्टिकचा वापर करावा.

Garba Night Makeup:
Navratri Garba Night: गरब्यात घागरा झालाय कॉमन, ट्रेंडी दिसायचं असेल तर फॉलो कर 'हे' इंडो-वेस्टर्न लुक्स

ऑइल फ्री मेकअप

मेकअपसाठी तुम्ही जी काही उत्पादने वापरत आहात, ती सर्व ऑईल फ्री आणि वॉटर प्रूफ असावीत हे लक्षात ठेवा. ऑइल फ्री आणि वॉटर प्रूफ उत्पादने वापरल्याने मेकअप जास्त काळ टिकतो. तसेच गरबा खेळताना घाम आल्यास मेखअप खराब होणार नाही.

सेटिंग पावडर

घाम येऊ नये म्हणून सेटिंग पावडर वापरा. यामुळे मेकअप बराच वेळ तसाच राहतो आणि मेकअप खराब होत नाही. तसेच गरबा खेळण्याचा घेऊ शकाल.

शीअर आयशॅडो

शीअर आयशॅडो तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक वाढवेल. यामुळे तुमची आयशॅडोखराब होणार नाही आणि तुमचे सौंदर्य वाढेल.

सेटिंग स्प्रे

सर्वात शेवटी मेकअप झाल्यानंतर सेटिंग स्प्रे वारवा. यामुळे तुमचा मेकअप खराब होणार नाही. तसेच मेकअप जास्त काळ टिकेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.