Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सवाची सुरूवात होणार, जाणून घ्या शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करावी?

Navratri 2024 : घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, कधी करावी घटस्थापना अन् कशी करावी,जाणून घ्या एका क्लिकवर
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024esakal
Updated on

 Shardiya Navratri 2024 :

हिंदू धर्मात नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करणे विशेषतः फलदायी मानले जाते. दरवर्षी ४ नवरात्र असतात. ज्यामध्ये दोन गुप्त नवरात्री, चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीचा समावेश होतो.

यावर्षी शारदीय नवरात्रीची प्रतिपदा तिथी 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:13 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:19 वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदयतिथीनुसार 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. (Navratri 2024)

Shardiya Navratri 2024
Navratri 2024 : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त; महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी, निर्भया पथकांस पोलिस सतर्क

तर, शारदीय नवरात्री 12 ऑक्टोबर रोजी संमाप्त होईल . या वर्षी माता दुर्गेचे आगमन आणि वाहन दोन्ही अशुभ असल्याचे मानले जात आहे. घटस्थापनेचा मुहूर्त अन् संपूर्ण विधी जाणून घेऊयात.

 

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त (Ghatsthapana Muhurta)

यंदा अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवारी 4 ऑक्टोबरला रोजी पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी समाप्त होईल.

हिंदू पंचागानुसार घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत ते 8 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल.

घटस्थापना कशी करावी ? (Ghatsthapana Vidhi)

नवरात्री उत्सवात देवीची विधीव्रत घटस्थापना कशी करावी याबद्दल धर्म अभ्यासक नरेंद्र धारणे सांगतात, आश्विन शुद्ध प्रतिपदेला घरात अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करावी. सर्वप्रथम घराच्या मुख्य दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे.

घराच्या याच मुख्य प्रवेशद्वारामार्गे देवीचे आगमन आपल्या घरात होते. नवीन रेशमी वस्त्र नेसून पूजेसाठी पाटावर बसावे. तेलवात घातलेली समई, धूप- अगरबत्ती प्रज्वलित करून स्वतःच्या कपाळी कुंकुवाचा टिळा लावून पूजेला आरंभ करावा.

 

Shardiya Navratri 2024
Dhule Navratri Flower Rates: नवरात्रोत्सवात फुलांची दरवळ महागणार! झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा आतापासूनच खोतोय भाव

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

यामंत्राने सर्वप्रथम गणेशाचे स्मरण करावे. त्यानंतर एका तांब्याच्या कलशावर ताम्हण ठेवावे, या ताम्हणात गहू किंवा तांदूळ ठेवावे. त्यात मुख्य देवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांसह कुलस्वामीनीची प्रतिमा, टाक असेल त्याची स्थापना करावी. यासह देव्हाऱ्यातील देवतांची स्थापना करावी.

तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरून त्यात सुगंधी द्रव्ये, सव्वा रुपया व सुपारी टाकावी. त्या कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने ठेवून त्यावर मध्यभागी नारळ ठेवावे. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची धान्ये (टाकावी) पेरावी.

Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri Decoration Idea 2024: अंबाबाईचा उदो उदो..! नवरात्रीत पूजास्थळ सजवण्यासाठी 'या' वस्तूंचा करा वापर, लाभेल सुख-समृद्धी

या पेरलेल्या धान्यावर रोज पाणी शिंपडावे. ते छोटेसे शेत फुलून आले की घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते अशी कल्पना आहे. याच हेतूने घटस्थापनेवेळी हे धान्य रुजत घालतात. याच्या एका बाजूला घंटा, दुसऱ्या बाजूला शंख ठेवावे व मधोमध निरांजन प्रज्वलित करावी.

देवीसमोर आपल्या कुळातील परंपरेनुसार अखंड नंदादीप, दिवा, समई पेटत ठेवतात. तसे आपल्या परंपरेनुसारे असेल त्याप्रमाणे दीप प्रज्वलन करावे. दिव्याच्या ज्योतीतून निघालेला प्रकाश हे देवीच्या तेजाचे प्रतीक आहे, देवीच्या शक्तीचे स्वरूप आहे, अशी मान्यता आहे.

Shardiya Navratri 2024
Navratri Recipe :  डोसा,थालीपिठाची चव वाढवणारी उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची माहितीये का?

कलशाला पुष्पहार घालून कलशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडावी. यालाच मालाबंधन असे म्हणतात. नवरात्रीच्या काळाता या मालाबंधनाला विशेष महत्व आहे. यानंतर देवीला आपल्या कुळातील परंपरेनुसार तयार केलेला नैवेद्य अर्पण करुन आरती करुन देवीचे या मंत्रांद्वारे स्मरण करावे.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.