Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या पहिल्या माळेला माता शैलपुत्रीला आहे बहुमान, अशी करा तिची पूजा, देवी होईल प्रसन्न

Mata Shailputri Puja Vidhi And Mythological Story : देवीच्या मुळ रूपांचीही नऊ दिवसात पूजा केली जाते. त्यापैकी पहिले रूप माता शैलपुत्रीचे.
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024esakal
Updated on

Shardiya Navratri  :

नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस होय. दरवर्षी वर्षातील ९ दिवस प्रत्येकाच्या घरी देवी विराजमान होते. देवी म्हणजे स्त्री, एक स्त्री जशी तिच्या उदरातून नवा जीव जन्माला घालते तशी घरात केलेली घटस्थापना होय.

घटस्थापना म्हणजे देवीचेच प्रतिक. घटाच्या बाजूला असलेल्या मातीतून नवे बिज अंकुरते जसे देवीने धरणीमातेचे रूप घेऊन नवा जीव जन्माला घालावा, अशी ही नवरात्री.  

नवरात्री जशी देवीच्या प्रमुख रूपांची ओळख करून देते. तशी ती तिच्या काही मुळ रूपांचीही ओळख आपल्याला सांगते. देवीच्या मुळ रूपांचीही नऊ दिवसात पूजा केली जाते. त्यापैकी पहिले रूप माता शैलपुत्रीचे. (Mata Shailputri Puja Vidhi And Mythological Story)

Shardiya Navratri 2024
Dhule Navratri Flower Rates: नवरात्रोत्सवात फुलांची दरवळ महागणार! झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा आतापासूनच खोतोय भाव

दुर्गा मातेचे शैलपुत्री रूप कसे निर्माण झाले, त्याची एक कथा सांगितली जाते. तसेच, या देवीची पूजा कशी करावी, देवीसाठी नैवेद्य काय असावा यालाही विशेष महत्त्व आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

शैलपुत्री मातेची पूजा कशी करावी? (Mata Shailputri Puja Vidhi)

शैलपुत्री देवीची पूजा करण्यासाठी पांढरे वस्त्र परिधान करावे. पूजेसाठी सर्वप्रथम चौरंगावर लाल किंवा पांढरे कापड पसरा. आता चौरंगावर माता शैलपुत्रीची मूर्ती किंवा देवीची प्रतिमेची प्रतिष्ठापना करा. देवीला फुलं,हार घाला. तिला हळद-कुंकू वहा. देवीच्या समोर रांगोळी काढा.

विधीनुसार पूजा करून दुर्गा मातेच्या या रूपासमोर तुपाचा दिवा लावावा आणि लाल कपड्यात 5 सुपारी बांधून मातेच्या चरणी अर्पण करा.

Shardiya Navratri 2024
Nashik Navratri Festival 2024: नवरात्रोत्सवासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त! आवाजाची मर्यादा ओलांडल्यास होणार पोलीस कारवाई

देवी शैलपुत्रीला आवडतो पांढरा रंग

माता शैलपुत्री बद्दल पुराणात आणि धर्मग्रंथात असे म्हटले आहे की देवी शैलपुत्रीला पांढऱ्या वस्तू सर्वात जास्त आवडतात. म्हणून माता शैलपुत्रीच्या पूजेत पांढऱ्या फुलांनी सजवून मातेला शुभ्र वस्त्रे अर्पण केली जातात. मातेला पांढऱ्या वस्तू अर्पण करा.

देवीला कोणता प्रसाद अर्पण करावा?

मातेच्या पूजेत पांढऱ्या रंगाची मिठाई, पदार्थ अर्पण करावे. खव्याचे पेढे,बत्ताशे असे पदार्थ देवीला आवडतात. हा प्रसाद अर्पण केल्यानंतर ती कुमारी मुलींना प्रसाद म्हणून वाटावी. आईचे हे रूप पर्वताप्रमाणे आहे त्यामुळे त्याला स्थीरतेचे प्रतीक मानले जाते.

Shardiya Navratri 2024
Navratri 2024: नवरात्रीत विड्याच्या पानांशी संबंधित करा 'हे' उपाय, आर्थिक संकट दूर होऊन भाग्य उजळेल

माता शैलपुत्रीचा मंत्र कोणता आहे?

ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॐ शैलपुत्री देव्यै नम:।

शैलपुत्री मातेची पौराणिक कथा (Story of Mata Shailputri )

शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात. सती प्रजापती दक्ष यांची कन्या होय. वडिलांच्या विरोधात जात सतीमातेने भगवान शिवांशी विवाह केला होता. त्यानंतर काही वर्षांनी प्रजापती दक्षने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले. यासाठी त्याने सर्व देवी-देवतांना आमंत्रणे पाठवली, परंतु भगवान शिवाला नाही.

देवी सतीला आमंत्रण येणार हे चांगलेच माहीत होते, पण तसे झाले नाही. ती त्या यज्ञाला जायला हताश होती. पण भगवान शंकरांनी नकार दिला. यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सती राजी झाली नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिली.

Shardiya Navratri 2024
Navratri Recipe :  डोसा,थालीपिठाची चव वाढवणारी उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची माहितीये का?

शेवटी स्त्री हट्ट पुरवत शिवांनी सतीला तिथे जाण्याची परवानगी दिली. सती जेव्हा तिचे वडील प्रजापीत दक्ष यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की कोणीही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते. त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते. पण कोणीही सतीची चौकशी सुद्धा केली नाही. केवळ आईने सतीमातेला प्रेमाने मिठी मारली.

एवढंच नाहीतर, सतीच्या इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली. तसेच, सतीचा पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला. खुद्द राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडली नाही. हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या.

Shardiya Navratri 2024
Navratri 2024 : एक-दोन नव्हे तर पुण्यात आहेत देवीची इतकी मंदिरे, तुम्हाला माहितीयेत का?

त्यांना स्वत:चा आणि भगवान शंकरांचा अपमान सहन होत नव्हता. त्यामुळेच रागाच्या भरात सतीने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वत:ला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले. भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले. दु:खाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञाचा नाश केला. त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला. हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले. (Navratri 2024)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.