नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर येणारी विजयादशमी एक शुभ मुहूर्त मानले जाते. कारण या दिवशी जग कल्याण करणारी आई जगदंबा माता दृष्टांचा नाश करते. महिषासुरासारख्या दृष्ट राक्षसांचा विनाश करते. त्यामुळे हा दिवस वाईट वरती सत्याचा विजय मानला जातो.
दसऱ्या दिवशी सर्वत्र प्रसन्न वातावरण असतं. सर्वांच्या घरी तोरणं लागलेली असतात. आंब्याच्या पानांचा आणि झेंडूच्या फुलांचा एक वेगळा सुवास घरभर पसरलेला असतो. घरात गोड पदार्थाचा नैवेद्य केला. दारात रांगोळ्या काढल्या जातात.
यंदाच्या दसऱ्यासाठी तुम्ही एखादी चांगली रांगोळी शोधत असाल. तर आम्ही तुम्हाला चांगल्या रांगोळ्या सुचवतो. रांगोळीच्या या काही सोप्या डिझाइन्स तुम्ही तुमच्या दारात काढून तुमच्या अंगणाची शोभा वाढवू शकता.
तुमचे अंगण मोठे असेल तर मोठी संस्कारभारती रांगोळी तुम्ही नक्कीच काढू शकताय ज्यामुळे संपूर्ण अंगणाला एक वेगळा लुक येईल.
तुम्ही आपट्याची पाने वापरून रांगोळी काढू शकता. रांगोळी काढण्यासाठी खऱ्या आपट्याच्या पानांचा वापर करू शकता.
तुम्ही रांगोळीत आपट्याच्या पानांची डिझाईन बनवू शकता.
तुम्ही संस्कृतीचे प्रतिक असलेले सरस्वती चिन्ह रेखाटू शकता. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सरस्वती चिन्ह दारात काढणे शुभ मानले जाते.
दसरा म्हणजे असत्यावर सत्याचे प्रतिक मानला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला. त्यामुळे विजयोत्सव म्हणून रांगोळी काढली जाते.
देवी दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला होता. तो असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच ही दशमी 'विजयादशमी' म्हणून ओळखली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.