सर्वोत्तम बसण्याची स्थिती कोणती आहे?
पाठीला सपोर्ट असलेल्या अर्गोनॉमिक खुर्च्या वापरा. तुमच्या खुर्चीला कमरेचा आधार नसेल, तर खुर्ची आणि तुमच्या पाठीच्या खालच्या बाजूला एक लहान उशी किंवा टॉवेल रोल वापरा.
आपल्या मांड्या जमिनीला समांतर ठेवा, गुडघे नितंबांच्या समान पातळीवर ठेवा.
तुमचे पाय जमिनीवर विसावले पाहिजेत. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी आपण पायाखाली स्टूल किंवा काहीतरी आधार देण्यासाठी ठेवावे.
आपले हात बाजूला ठेवा आणि हात जमिनीच्या समांतर ठेवा. तुमचे वर्क डेस्क जवळ ठेवा आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू आवाक्यात ठेवा.
तुमचा स्क्रीन डोळ्याच्या पातळीवर ठेवा. हे साध्य करण्यासाठी तुम्ही वॉल माउंट्स, मॉनिटर डेस्क किंवा पुस्तकांचे स्टॅक वापरू शकता.
दीर्घ फोन संभाषणांसाठी हेडसेट वापरा.
दीर्घकाळ बसून राहिल्याने रक्तप्रवाह कमी होतो आणि स्नायूंचा थकवा येऊ शकतो. म्हणून, वारंवार विश्रांती घ्या.
दर ३० मिनिटांनी एक ते दोन मिनिटांचा ब्रेक घ्या. कमीतकमी, उठून दर तासाला फिरा. उभे राहा, फिरा, शरीर ताणून घ्या, दीर्घ श्वास घ्या. खुर्चीला चिकटून बसण्याशिवाय काहीही करा.
तात्पर्य; तुमच्या झोपेमध्ये आणि कामाच्या आसनांमध्ये लहान समायोजन केल्याने तुमच्या भविष्यात अनेक स्नायू आणि सांधे संबंधित वेदना टाळता येऊ शकतात!
(लेखक संचेती हॉस्पिटलमध्ये मणका तज्ज्ञ आहेत. या लेखाच्या डॉ. फरहिन पटेल या सहलेखिका असून, त्या संचेती हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.