Sleep Disorder : रात्रीच्या वेळी एकदा गेली पुन्हा झोप लागतच नाही? या गोष्टी एकदा ट्राय करून बघा!

रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट खाऊ नका
Sleep Disorder
Sleep Disorderesakal
Updated on

Sleep Disorder : दिवसभर मेहनतीचं काम करणाऱ्या व्यक्तीला रात्री लगेचच निवांत झोप लागते. पण आजकालच्या लोकांच्या डोक्याला इतका ताप आहे. सतत टेंशन घेणाऱे लोक शांत झोपत नाहीत. तर, रस्त्यावर मेहनत करणारे लोक अगदी फुटपाथवरही पेपर अंथरून गाढ झोपतात.

तज्ज्ञांच्या मते, सामान्यपणे व्यक्तीने किमान ८ तास झोप घेतली पाहिजे. तुम्ही लवकर झोपून पहाटे उठून दिनचर्या सुरू शकता. पण, लोकांची झोपच उडाली आहे. १२ वाजून गेल्यानंतरच लोकांची रात्र होते. त्यातही सतत जाग येते. गाढ झोप लागतच नाही. (Sleep Disorder : Suddenly wakes up at night? So repent from these mistakes today itself)

यामुळे झोप आपल्याला निरोगी ठेवते आणि शरीराला प्रभावीपणे कार्य करण्यासाठी खूप महत्वाची आहे. तुमचा मेंदू रात्री फक्त थोडा वेळच विश्रांती घेतो. अशा परिस्थितीत रात्री जागं राहिल्यास मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते आणि कमजोर स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्यास समस्या, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आणि मूड बदल यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.

Sleep Disorder
Sleeping Tips : पायांमध्ये उशी घेऊन झोपण्याचे हे 7 फायदे माहितीये?

परंतु काही लोकांना पुरेशी झोप मिळत नाही कारण ते रात्री वारंवार जागे होतात आणि नंतर झोपायला बराच वेळ लागतो. अडचणींचा सामना करा. ही समस्या कशी टाळता येईल ते जाणून घेऊया.

झोप न येण्याचे कारण

आपण अनेकदा याकडे लक्ष देत नाही, पण रात्री नीट झोप न येण्यामागे आपल्या खाण्याच्या सवयीही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. शांत झोप लागण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट खाऊ नका

रात्री झोपण्यापूर्वी त्या पदार्थांचे सेवन करू नका ज्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामध्ये भात, चिप्स, बटाटे, केळी आणि पास्ता यासारख्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कार्बोहायड्रेट गोष्टींमुळे झोपेचा त्रास होतो आणि तुम्हाला रात्री पुन्हा पुन्हा जागे व्हावे लागते.

Sleep Disorder
Sleep Divorce म्हणजे काय? ज्याच्या मदतीने जोडपी नातं सुधारण्याचा प्रयत्न करतात, याची गरज कुठे पडते? जाणून घ्या

चहा-कॉफी टाळा

भारतात चहा आणि कॉफी पिणार्‍यांची कमतरता नाही, परंतु हा छंद तुमची झोप खराब करू शकतो कारण त्यात भरपूर कॅफीन असते. अनेकदा आपण झोपेतून सुटका करण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी चहा-कॉफी पितो, पण झोपण्याच्या २-३ तास ​​आधी हे अजिबात करू नका. (Sleep Health Tips)

 टेन्शन घेऊ नका

आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव असणे हे सामान्य आहे, परंतु जर तुम्ही त्याला जास्त प्रमाणात वरचढ होऊ दिले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो, जे झोपेच्या विकाराचे प्रमुख कारण आहे.  

Sleep Disorder
Sleeping Hours : सहा तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर व्यायाम करणे ठरेल व्यर्थ! वाचा सविस्तर

मेडिकेटेड मिल्क

निद्रानाशाच्या समस्येवर मेडिकेटेड मिल्क रामबाण उपाय म्हणून काम करते. ते तयार करण्यासाठी १ ग्लास दुधात १/४ चमचे जायफळ पावडर, चिमूटभर हळद, चिमूटभर वेलची पावडर मिसळा. आता 5 मिनिटे उकळवा. ते गाळून रोज झोपण्यापूर्वी सेवन करा. (Sleep)

जीवनशैली चांगली ठेवा

जर तुम्हाला झोप न लागण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही जीवनशैलीत हे काही बदल करून यापासून सुटका मिळवू शकता. यामध्ये जेवल्यानंतर 100 पावले चालणे, रात्री 10 वाजण्यापूर्वी झोपणे, फोन, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर झोपण्याच्या एक तास आधी न करणे आणि दररोज हे रूटीन फॉलो करणे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.