Sleeping Tips : तुमची झोप अस्वस्थ असते का? शांत झोपेसाठी फॉलो करा 'या' टिप्स

रात्री शांत झोप लागत नसेल तर इथे काही अशा सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे गाढ झोप लागू शकेल. जाणून घ्या.
Sleeping Tips
Sleeping Tipsesakal
Updated on

Sleeping Tips : दिवसभर दमून पण रात्री शांत झोप लागत नाही. रात्री पूर्ण ७-८ तास झोप होऊनपण सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही. काम करण्यात उत्साह राहत नाही. अशा तक्रारी अनेकदा ऐकायला मिळतात. पण यासाठी आपण काय बदल करायला हवे आणि काय उपाय करायला हवे ते लोकांना समजत नसते. तज्ज्ञांच्या मते किती तास झोपले यापेक्षा किती गाढ किंवा शांत झोपले हे आवश्यक असते. त्याविषयी सांगणार आहोत जाणून.

Sleeping Tips
Sleep : संध्याकाळी झोपणारे 'या' तीन देवींच्या आशीर्वादापासून राहतात वंचित

झोप शांत लागण्यासाठी उपाय

  • झोपण्यापूर्वी पाय धुवून घ्या. पायाच्या तळव्यांचा मसाज करणे चांगले असते.

  • झोपताना सैल आणि आरामदायक कपडे घालावेत, ज्यामुळे शरीरात हवेचा संचार होईल.

  • झोपण्यापूर्वी काही वेळ दीर्घ श्वसन करा. तसेच ध्यान अवश्य करा.

Sleeping Tips
Sleeping Record : ऐकावं ते नवलच! भारतीय मुलीने झोप काढून जिंकले लाखो रुपये
  • दक्षिणेकडे पाय करून झोपू नका.

  • गुरू, देवता, त्यांच्या मूर्ति, चित्र, वस्तू तसेच आदराच्या स्थानाकडे पाय करू नये.

  • स्वयंपाक घरात झोपू नये. तसेच बेडरूममध्ये खाद्यपदार्थ ठेवू नये.

  • बेडरूममध्ये ताजी खेळती हवा यायला हवी याकडे लक्ष द्या.

Sleeping Tips
Sleeping Problems During Work: ऑफिसमध्ये झोप येऊ नये म्हणून काय करावे?
  • कधीही अंधाऱ्या, दमट आणि ओलसर खोलीत झोपू नये.

  • झोपताना डोकं थोडं उंच ठेवा. त्याकरिता पातळ उशीचा वापर करा.

  • उन्हाळ्यात छतावर किंवा मोकळ्या आकाशाखाली झोपू शकता. मात्र थंडी किंवा पावसाळ्यात नको.

  • थेट सूर्यप्रकाशात झोपणे योग्य नाही. मात्र वातावरण चांगले असल्यास टिपूर चांदण्याखाली तुम्ही झोपू शकता.

Sleeping Tips
Sleep Routine : साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपत असाल तर सावधान!
  • बेडवर स्वच्छ व मऊ बेडशीट घातलेली असावी.

  • खोलीत मंद सुगंधाचा दरवळ आणि मधुर संगीत ऐकत झोपावे.

  • योग्य वेळेत झोपण्याची आणि जागे होण्याची सवय लावावी.

  • डोक्याला व शरीराला तेलाने मालिश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.