Sleeping Tips : सावधान! हिवाळ्यात सकाळी लवकर उठणं ठरू शकतं धोक्याच, शास्त्रज्ञांचा नवीन शोध

सकाळी लवकर उठायची सवय कधीही चांगली
Sleeping Tips
Sleeping Tipsesakal
Updated on

Sleeping Tips : सकाळी लवकर उठायची सवय कधीही चांगली. आपण आपल्या आजीकडून हे ऐकलंही असेल की “जो सकाळी लवकर उठतो, त्याला सुख, शांती, समाधान, भरभराट, यश सगळंच मिळत.” पण शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनानुसार ही बाब धोकादायक आहे.

Sleeping Tips
Cancer Vaccine : खुशखबर! कॅन्सरचा धोका टळला; डॉक्टरांनी शोधल वॅक्सिन

अनेकांना सकाळी लवकर उठण्याची सवय असते, किंवा ऑफिसच्या कामामुळे, कॉलेजमुळे, मुलांच्या शाळेमुळे लवकर उठाव लागतं. पण हे असं बळजबरी उठणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

Sleeping Tips
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

शरीराला कमीत कमी 5-6 तासांची झोप गरजेची असते. असा सामान्य समज आहे की, रात्री जागरण करून काम करणारे लोकं क्रिएटिव असतात, आणि अनेक कलाकार हे मान्यही करतील की जे लक्ष आपल्या कामात रात्री लागत ते दिवसा लागत नाही. विद्यार्थ्यांनाही रात्रीच अभ्यास करायचा असतो.

Sleeping Tips
Parenting Tips : ट्रॅव्हल, फूड नव्हे तर, पॅरेंटिंगच्या 'या' टिप्स ठरल्या 2022 मध्ये हीट

हिवाळ्यात मुद्दाम लोकं सकाळी लवकर उठतात

काही लोकं हिवाळ्यात व्यायाम करण्यासाठी मुद्दाम लवकर उठतात. हिवाळ्यात स्नायूंचे त्रास वाढू शकतात, शिवाय साथीच्या आजरांचा धोकाही असतो. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लोकं व्यायामाला प्राधान्य देतात. आपल्या कामाला लागण्याआधी लोकं लवकर उठून व्यायाम करतात.

Sleeping Tips
Crude Oil : इराक, सौदी अरेबिया ना अमेरिका, भारत घेतोय "या" देशाकडून सर्वात जास्त क्रूड ऑइल

नक्की काय होतं नुकसान?

आपली झोप अपूर्ण ठेवणं हानिकारक आहे कारण झोप ही शरीरासाठी खूप गरजेची असते, अशात लवकर उठण्याने दुसऱ्या दिवशी खूप त्रास होऊ शकतो. पित्त खवळण, अॅसिडिटी, डोके दुखी, चिडचिड, आळस येणं अशा गोष्टींचा त्रास होतो. शिवाय शरीराला आपले कार्य चालवण्यासाठी नैसर्गिक दृष्ट्या तितकी ऊर्जा मिळत नाही.

Sleeping Tips
Jaypee Cement : एकेकाळी होता फक्त 218 रुपये पगार; आज देशाच्या कोट्याधीशांच्या यादीमध्ये आहे नाव

यावरती नक्की उपाय कोणते?

- जर लवकर उठायचे असेल तर रात्री लवकर झोपा

- आपली झोप किमान 6 तासांची होईल असे दिवसाचे नियोजन करा

- जर कामामुळे रात्री उशीर होत असेल तर सकाळी लवकर उठण्याचा अट्टहास सोडा.

Sleeping Tips
Sanjay Gandhi Death Anniversary : लेकाची गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून इंदिरा गांधी खुश झाल्या

- शक्य असल्यास दुपारी किमान अर्ध्या तासाची झोप घ्या.

- आम्लयुक्त पदार्थ खाणं किंवा पिण टाळा.

- रात्री उशिरापर्यन्त जागण्यापेक्षा सकाळी लवकर उठून काम करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.