तीन वर्षांपूर्वी कोरोनाने भारतात धुमाकूळ घातला होता. यात अनेकांनी आपले जीवलग गमावले. तर काहींनी आपल्या मुलांचे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहिले. कोरोनाने लोकांना सामाजिक बांधिलकीही शिकवली. अन् लोकांचेही मदतीचे हात अनेकांपर्यंत पोहोचले. अशा या कोरोनाच्या अनेक बाजू आज आठवतात.
पण हाच कोरोना एखाद्याचं आयुष्य उध्वस्त करू शकतो. तर दुसरीकडे, पुन्हा लढायलाही शिकवू शकतो. आज आपण अशाच एका जिद्दीने उभ्या राहणाऱ्या तरूणीची गोष्ट पाहणार आहोत. जिने जीवनात फक्त संघर्ष केला आहे अन् तिचा संघर्ष अजूनही सुरू आहे. तसेच, तिचा संघर्ष इतरांनी नाही तर तिच्या नशिबाशी आहे. ही आहे तिची गोष्ट, कोल्हापुरातील आजरा गावात राहणाऱ्या स्वप्नाली कांबळेची. (Corona Success Story)
प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची एक वेगळी कथा असते. तशीच माझ्या जन्माची पण आहे. सर्वांचे जन्म दवाखान्यात होतात. पण, माझा जन्म गोठ्यात झाला. माझी आई तिसऱ्यांदा पोटुशी होती. तेव्हा ती गोठ्यात काम करत होती अन् अचानक प्रवसवेदना सुरू झाल्या. तेव्हा माझा जन्म झाला.
माझ्या आई-वडिलांना आधीच दोन मुली होत्या. माझा जन्म झाला तेव्हा सर्वांनीच नाराजी व्यक्त करून माझ्या आईचं सांत्वन केलं. माझ्या वडिलांना तर मी नकोशीच होते. या नाराजीची सल माझ्या आईला सोसावी लागली. कारण, या कोवळ्या बाळंतीणीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं.
अशा नकोशीच बालपण भावाशी तुलना करण्यात गेलं. मात्र शाळांमध्ये मी हुषार आणि खेळ, गाणी, नृत्य, कवायत या सगळ्यांमध्ये मात्र अव्वल असणारी मी व्याच्या 21 व्या वर्षी लग्नाच्या मंडपा- पर्यंत पोहोचले. लग्न माझ्या व कुटुंबाच्या मर्जीन झालं. T.Y.BA. ची लास्ट परिक्षा दिली आणि काही दिवसातच लग्न झालं. माझ्या माझ्याकडूनच खूप अपेक्षा होत्या. पण असं वाटलं की लग्न झाल्यावर सगळ संपलं. पण तसं नव्हतं माझे पती खूप समजूतदार आणि मनमिळावू होते.
हो होते. कारण ते आत्ता या जगात नाहीत. त्यांना मी न सांगताच सर्व गोष्टी समजायच्या. त्यांनी माझे M.A. पूर्ण करण्यासाठी माझी साथ दिली.सुरूवातीला सासू-सासरे नको बोलत होते. पण त्यांनी मला समजून घेतलं. आणि मी एम.एच शिक्षण पूर्ण केलं. शिवाजी विद्यापीठात असताना मला MPSC ची माहिती मिळाली. त्याबदृष्टीने प्रयत्न चालू झाले. सोबत स्त्री-शिक्षण घेत होने.
खुप चांगलं सुरू होत सगळ तेवढ्यात 2021 मध्ये बाळाचा विचार केला. कारण कोवीड आल्यामुळे परिक्षा वेगैरे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोना काळात बाळ पोटात होतं. मी सहा महिन्याची गर्भवती होते. अन् सासू-सासरे कोरोना पॉझिटीव्ह झाले. त्यांना कोरोना सेंटरमध्ये हलवण्यात आले. आम्ही नवरा-बायको घाबरून होतो. कारण, माझ्या पोटात वाढत असलेल्या बाळालाही कोरोना होण्याची शक्यता होती. (Navratri 2024)
थोड्याच दिवसात कोरोनामुळे सासु-सासरे गेले. हा धक्का पचवणे तसे अवघड. तोवर दुसरा धक्का बसला, हा धक्का मी अजूनही पचवू शकले नाहीये.
सासू-सासऱ्यांचे निधन झाले तेव्हा पतीही कोरोना पॉझिटीव्ह झाले.त्यांनाही कोरोना सेंटरमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, सासु-सासऱ्यांनंतर १५ व्या दिवशी माझ्या पतीचीही प्राणज्योत मालवली. हा सगळ्यात मोठा धकका होता माझ्यासाठी सगळं जग थांबल्यासारखे झाले.
आता सगळं संपल असाच विचार राहून राहून मनात यायचा. अनेकवेळा वाईट विचारही मनात यायचे. पण, माझ्या मैत्रिणी आणि माहेरच्या आपल्या माणसांनी समजून काढत या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
पतीची आठवण अन् पुढे काय न कसं व्हायचं, याचा विचार ना अन्न खाऊ देत नव्हता ना झोपू देत होता. अशातच मलाही आजारपणाने वेढलं. माझी प्रकृती खालावली. मला डेंग्यू झाल्यामुळे लवकर प्रसुती करावी लागली.
आपल्या बाळासाठी आपल्यालाच झटावं लागले याची जाणिव तेव्हा झाली. कारण, आईचेही निधन झाले होते. त्यामुळे मी एकटी पडले होते. डिलिवरीच्या दिवशी एकटीच तपासणीसाठी गेले असताना डॉक्टरांनी लगेचच डिलिव्हरी करायला हवी असे सांगितले. अन्यथा, माझ्या जगण्याची एकमेव आशा असलेले माझे बाळालाही धोका निर्माण होऊ शकणार होता.
हे ऐकून पायाखालची जमिन सरकली. मी ताबडतोब सगळ्या टेस्ट करायला लावल्या. आणि हॉस्पिटलमध्ये भरती झाले. बहिणीला फोन करून सर्वकाही सांगितले. मग त्यानंतर मी माहेरी राहिले. माहेरी बाबा अन् बहिण होती. त्यामुळे त्यांना त्रास होऊ न देता, मीच मालिश करून त्याच सगळं करायचे. वेळ बदलते तसं लोकही बदलतात. अन् माझे बाबाही माझी आता काळजी घेतात, इतकेच काय ते समाधान.
सध्या मी माझ्या नवऱ्याच्या घरी राहते. या राहत्या घरासाठी मला कोर्टकचेरीच्या चकरा माराव्या लागल्या. पण मी त्यामध्येही डगमगले नाही. आता मी केक बनवण्याचा छोटा व्यवसाय करते आहे. तसेच, MPSC च्या परिक्षेची तयारीही करत आहे. सध्या पगारिया वेलफेअर फौडेशनमध्ये कार्यरत आहे. (Navratri 2024)
या संस्थेतर्फे समाजातील गरजू मुलांसाठी आणि महिलांसाठी काहितरी करण्यासाठी धडपडत आहे. सध्या मी जे काही करते आहे ते फक्त माझ्या तीन वर्षाच्या बाळासाठी. कारण, तोच आहे आता माझ्या जगण्याचा आधार.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.