Talking In Sleep: तुम्हालाही झोपेत बोलण्याची सवय आहे? या गोष्टींपासून राहा दूर, सहज कमी होईल समस्या

अनेकांना रात्री झोपेत स्वतःशी बोलण्याची सवय असते.
Sleep
Sleepsakal
Updated on

रात्री झोपताना स्वतःशीच बोलायची सवय अनेकांना असते. ही सवय तुमचा जोडीदार, कुटुंबातील सदस्य आणि घरी आलेल्या नातेवाईकांनाही त्रास देऊ शकते. ही समस्या तुम्हाला सामान्य वाटू शकते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे खूप चुकीचे आहे. ही समस्या तुम्हाला आणखी अनेक समस्यांमध्ये टाकू शकते. बऱ्याच लोकांचे असे मत आहे की ते स्वप्न पाहतात, म्हणूनच ते झोपेत बोलतात.

पण तज्ज्ञांच्या मते हा थकवा आणि तणावामुळे होणारा आजार आहे. डॉ. डी.एस. मारटोलिया, मुख्य प्राध्यापक, कम्युनिटी मेडिसिन, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (कनौज) यांच्याकडून जाणून घेऊया, झोपेत बोलण्याचे कारण काय आहे आणि आपण ते कसे टाळू शकतो-

ही कारणे असू शकतात

झोपेत बोलण्याच्या या समस्येला पॅरासोमनिया म्हणतात. म्हणजे झोपताना असामान्य वागणे. साधारणपणे असे दिसून आले आहे की काही लोकं झोपेत 30 सेकंद बोलतात तर काही त्यापेक्षा जास्त. सगळ्यात महत्वाचे म्हणजे झोपेत बोलणे कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही, परंतु हे निश्चितपणे निद्रानाश किंवा आरोग्याच्या आजाराकडे सूचित करते. या समस्येला REM स्लीप बिहेवियर डिसऑर्डर असे देखील म्हणतात.

तुम्ही झोपेत ओरडणे, बडबड करणे इत्यादी गोष्टी करता तेव्हा तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण हे पार्किन्सन्ससारख्या आजारांचे लक्षण देखील असू शकते. झोपेत एखादी व्यक्ती स्वप्न पाहते याला आरईएम स्लीप असे म्हणतात.

या हानिकारक गोष्टींपासून राहा दूर

दारू सोडा: आरोग्यासाठी दारू पिणे हानिकारक आहे. दारू पिण्याचे काही लोकांना इतके व्यसन लागते की त्यांना त्यांच्या शरीराचीही पर्वा देखील नसते. कधी कधी त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. यामुळे असे लोक झोपेत असताना जुन्या गोष्टी बडबड करू लागतात. यासाठी दारू सोडणे हा चांगला पर्याय आहे.

तणावमुक्त राहा: झोपेत बोलणे हा आजार असू शकत नाही, परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःला यासाठी तणावमुक्त ठेवणे चांगले. जर तुम्हाला ऑफिसच्या कामाचा स्ट्रेस असेल तर लवकरात लवकर ते कमी करा. जेणेकरून या समस्येवर मात करता येईल. तुम्हाला शक्य असल्यास, ध्यान करा. तसेच तणावामुळे मनावर नेहमीच एक विचित्र दबाव असतो, ज्यामुळे चांगली झोप येत नाही.

जास्त प्रमाणात कॅफिन टाळा: जर एखाद्याला झोपेत बोलण्याची सवय असेल, तर त्याने कॅफीन-चहाचे अतिसेवन टाळावे. रात्रीच्या वेळी कॅफिन असलेल्या गोष्टी घेतल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होतो, जो आरोग्यासाठी चांगला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.