Lemon And Honey Water: सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन करता याचा शरीरिक आणि मानसिक आजार, तसेच त्वचेवर होतो. शरीराला डिटॉक्स आणि वजन कमी करण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत लोक सकाळी वेगवेगळ्या प्रकारची हर्बल पेये पितात.
अनेक लोक सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबू रस टाकून सेवन करतात. असा दावा केला जातो की कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोट स्वच्छ होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते. म्हणूनच अनेक लोक सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करून पितात. परंतु, हे पेय घेताना काही काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा शरीराला त्रास होऊ शकतो.
आयुर्वेदिक तज्ज्ञांनुसार कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. पण लिंबू पाणी आणि मधाचे मिश्रण प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकते. कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्यायल्याने अतिरिक्त चरबी कमी होते आणि यकृतही स्वच्छ होते. मध-लिंबू टाकून कोमट पाणी प्यायल्याने पोटातील गॅस कमी होण्यास मदत मिळते. पण पुढील समस्या असलेल्या लोकांनी मध-लिंबू आणि कोमट पाणी एकत्र पिऊ पिणे टाळावे.
अति-ॲसिडिटी आणि पित्त दोष असलेल्यांनी कोमट पाण्यासोबत लिंबू-मध रिकाम्या पोटी घेऊ नये.
ज्या लोकांची हाडे कमकुवत आहेत किंवा दात कमजोर आहेत त्यांनी कोमट पाण्यात लिंबू-मध मक्स करून पिणे टाळावे.
तुम्हाला तोंडात फोड येत असेल तर तुम्ही मधासोबत लिंबू पाणी पिणे टाळावे.
नेहमी कोमट पाणीच प्यावे. अतिगरम पाणी पिणे टाळावे. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
पेय पिण्यापूर्वी नेहमी मध मिक्स करा. खूप गरम पाण्यात मध विरघळवू नका. लक्षात ठेवा की मध गरम करणे किंवा शिजवू नका.
एका वेळी फक्त अर्धा ते एक चमचे मध वापरा.
लिंबाचे प्रमाणही कमी ठेवा. जर तुम्ही पहिल्यांदा लिंबू पाणी पीत असाल तर अर्ध्या लिंबाचा रस घाला, जर कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत तर तुम्ही एक ते दोन लिंबाचा रस देखील घालू शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.