Navratri 2024: कन्यापूजनदिवशी मुलींना द्या याच भेटवस्तू, देवी होईल प्रसन्न

आठव्या दिवशी केले जाणारे कन्या पूजन अनेक मार्गांनी आपले सुखाचे दरवाजे उघडते असे मानले जाते.
Navratri 2024
Navratri 2024esakal
Updated on

Navratri 2024 :

नवरात्रीचा सण सर्व सणांमध्ये मोठा मानला जातो. नवरात्री नऊ दिवस नवदुर्गा आपल्या पृथ्वीतलावरती असतात. नवदुर्गांचे महत्त्व या दिवसात खूप वाढते. माता लक्ष्मी माता दुर्गा कोणत्याही रूपात तुम्हाला दर्शन देऊ शकतात.

नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्या पूजन केले जाते. नवदुर्गांचे प्रतीक म्हणून नऊ मुलींचे पूजन आणि त्यांना नैवेद्य केला जातो. नवरात्रीत अष्टमी आणि नवमी या दोन दिवसांना महत्त्व आहे. आठव्या दिवशी केले जाणारे कन्या पूजन अनेक मार्गांनी आपले सुखाचे दरवाजे उघडते असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक जण या गोष्टी कटाक्षाने पाळतो.

Navratri 2024
Navratri 2024 7th Colour: आज नवरात्रीचा शुभ रंग निळा, स्टायलिश लूक हवा असेल तर या अभिनेत्रींकडून घ्या आउटफिटची आयडिया

कन्या पूजन करण्याचा विचार करत असाल तर घरी देवीच्या रूपात येणाऱ्या मुलींना काय भेटवस्तू द्यावी. हा विचार तुम्ही करत असाल. तर तुम्ही या ऑप्शनचा विचार करू शकता.

ड्रेस

एखाद्याला भेटवस्तू देताना कपड्यांचा आधी विचार केला जातो. तुमच्या घरी येणार आहे नऊ मुलींना तुम्ही ओटी तर भरणारच असाल. शेवटी सोबत असताना त्यांच्या वयाचे नवे कपडे दिले तर त्यांना आवडतील. तुम्ही मुलींसाठी फ्रॉक, चुडीदार, लहंगा याचा विचार करू शकता.

Navratri 2024
Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी आरोग्यदायी नाश्ता करायचा असेल तर बनवा स्वादिष्ट 'पनीर खीर', नोट करा रेसिपी

खेळणी

लहान मुलींना अभ्यासाला उपयोगी पडतील अशी काही खेळणे तुम्ही त्यांना देऊ शकता. सध्या काही ऍक्टिव्हिटीज खेळणी मध्ये अनेक वरायटी उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही विचार करू शकता.

मेकअपचं किट

मुलींना नटायला खूप आवडतात. त्यामुळे मुलींसाठी तुम्ही मेकअप किट देऊ शकता. अगदीच महागडे नाही जमलं तरी लिपस्टिक फाउंडेशन काजळ अशा बेसिक गोष्टी तुम्ही देऊ शकता.

अभ्यासाचे साहित्य

तुम्ही घरी बोलवणार असलेल्या मुली एकाच वर्गातले नसतील. तरीही तुम्ही त्यांना वही, पेन पेन्सिल रबर अशा वस्तूंचे किट घेऊ शकता. मुलींना हे त्यांच्या अभ्यासात उपयोगी पडेल. तसेच तुम्ही मुलींना टिफिन बॉक्स आणि पाण्याची बॉटल देऊ शकता.

Navratri 2024
Navratri 2024 : नवरात्रीचा सातवा दिवस, अशी करा माता काळरात्रीची पूजा, होईल मृत्यूचे भय दूर

पर्स स्कूल बॅग

तुमच्या घरी देवीच्या रूपात आलेला मुलींना तुम्ही त्यांना आवडत असलेली पर्स किंवा स्कूल बॅग सुद्धा देऊ शकता. हे साहित्य त्यांच्या नक्कीच उपलब्ध पडेल.

नवरात्रीच्या काळात देवी स्वरूपातील मुलींना घरी बोलून त्यांचे आदरा आदित्य करून. त्यांना घोडाधोडाचा नैवेद्य दाखवणे तुमच्या फायद्याचे ठरेल. कारण परंपरेनुसार मुलींना जेवायला देणे म्हणजे साक्षात देवीला जेवायला बोलवले होय. त्यामुळे तुम्ही देवीला कधी विसरू नका. वाढदिवसाच्या काळात नक्की कन्या पूजन करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.