Sleep Tourism : चांगल्या आरोग्यासाठी ‘Nap Holiday’ करायलाच हवं; पण हे 'झोपेचे पर्यटन' नक्की आहे तरी काय?

Sleep Holiday तुम्हाला केवळ रिफ्रेश करत नाही. तर मेंदूलाही शांत राहण्यात मदत करतो.
Nap Tourism
Nap Tourismesakal
Updated on

What is Nap Tourism :

तुम्हाला सतत कामावर जाण्याची अन् काम नीट होण्याची काळजी लागून राहीलेली असते का? याचं उत्तर हो असेल तर तुमची अपुरी झोप या तणावासाठी कारणीभूत असू शकते. तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला नॅप टुरिझमची गरज आहे.

तुम्ही टुरिझमचे अनेक प्रकार ऐकले असतील. सोलो,ग्रूप, ऍडव्हेंचर टुरिझम याबद्दल तुम्हाला माहिती असेल. पण, कधी स्लीप टुरिझमबद्दल माहिती घेतलीय का? या प्रकारच्या ट्रॅव्हलला स्लीप स्टेकेशन, नॅप टुरिझम असेही म्हणतात. हे नक्की काय आहे, त्याचे फायदे काय आहेत अन् त्यासाठी लोकेशनची निवड कशी करावी यासाठीची संपूर्ण माहिती घेऊयात.

Nap Tourism
Share Market Holiday: स्वातंत्र्यदिनी शेअर बाजार आणि बँका राहणार बंद; स्टॉक एक्सचेंजने दिली माहिती

स्लीप टुरिझमला Napacations आणि Nap Holidays म्हणूनही ओळखलं जातं. या ट्रिपमध्ये लोक स्वतची झोप पूर्ण करण्यासाठी, स्वत:ला रिचार्ज करण्याचा प्रयत्न करतात. रोजच्या तणावातून बाहेर पडून लोक स्वत:च्या झोपेवर फोकस करतात. आणि या सुट्टीत फक्त आराम करतात.

लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे स्लीप टुरिझम

डॉक्टर आपल्याला पहिल्यापासून सांगत आले आहेत ते म्हणजे, आपल्याला ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. पण तणाव,कामाची धापवळ, दररोजचे रूटीन फॉलो करण्यासाठी प्रत्येकाला ८ तास झोप मिळत नाही. झोपेच्या वेळेतही लोक मोबाईल, लॅपटॉपवर काम करत बसतात. रात्री उशीरा झोपलो तरी सकाळी लवकर उठावे लागते त्यामुळे झोप अपूर्ण राहते.

Nap Tourism
Holiday Plan : ‘सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅन’ची वाढती पसंती

Nap Holiday मध्ये नक्की काय होतं?

Napcation मध्ये लोक एखाद्या परफेक्ट लोकेशनच्या शोधात असतात. जिथे त्यांना शांतता मिळेल. असे ठिकाण सापडल्यानंतर लोक स्वत:ला वेळ देतात. तिथे योग, व्यायाम, मसाज आणि पुरेपूर झोप घेऊन ते फ्रेश होतात. हा स्वत:ला दिलेला वेळ तुम्हाला केवळ रिफ्रेश करत नाही. तर मेंदूलाही शांत राहण्यात मदत करतो.

Nap Tourism
Bank holidays August: ऑगस्टमध्ये बँकांना सर्वात जास्त सुट्ट्या; RBIने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

स्लीप हॉलीडेचे फायदे काय आहेत

  • तणावापासून मुक्ती मिळते

  • शांत झोप लागते

  • तुमच्यातील गुणवत्ता वाढते

  • स्वत:चा शोध घेता येतो

स्लीप हॉलिडेसाठी कोणत्या ठिकाणी जाल

 कूर्ग

कूर्ग हे कर्नाटकमधील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. इथल्या वातावरणातील शुद्ध वातावरणात लोक राहणे पसंत करतात. इथे अनेक रिजॉर्ट आणि हॉटेल्सहे स्लीप टुरिझमसाठी खास पॅकेज देतात.

धर्मशाळा

हिमाचलमधील प्रसिद्ध हिमकड्यांमध्ये जाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर धर्मशाळा या ठिकाणाला भेट द्यायला हवी. कारण, हे हिमाचलमधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन असून इथे मोठ्या प्रमाणात लोक भेटी देतात. या ठिकाणी सुद्धा स्लीप टुरिझमसाठी खास पॅकेज देत असतात.  

धर्मशाळा, हिमाचल प्रदेश
धर्मशाळा, हिमाचल प्रदेश

दार्जिलींग

चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे. थंड हवेच्या ठिकाणी मसाले चहाचा आस्वाद घेण्यात काही वेगळीच मजा असते. दार्जिलींगमध्येही लोक स्लीप टुरिझम एन्जॉय करण्यासाठी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.