Navratri 2024 :  एड्सग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी दुर्गा कुंदन, ती देतेय मुलांना मायेची ‘करूणा’

एका मुकबधीर मुलीला पालक जोतिबा डोंगरावर सोडून गेले, कारण ती...
Navratri 2024
Navratri 2024esakal
Updated on

Navratri 2024 :

प्रत्येक माता, आई आपल्या चिमुकल्यासाठी जीवाचं रान करत असते. त्याला हवं-नको ते पाहत असते. पण, हे प्रेम इतरांच्या मुलांप्रती असणं तसं थोडं कठीणच. पण, काही इतर मुलांवरही आईसारखेच प्रेम करणाऱ्या काही मोजक्याच माता असतात. अशा आहेत कोल्हापुरातील करूणालय या एड्सग्रस्त संस्थेच्या कुंदन बनसोडे. (Navratri 2024)

आर्टिफिशिअल इंटलिजंसचा जमाना आला, जग कितीही पुढारलं तरी एड्सग्रस्त मुलांच्या बाबतीत अजूनही समाजातून नकारात्मक भावनाच दिसून येतात. समाज तर सोडा पण अशा मुलांच्या घरचे लोकही त्यांचा नीट सांभाळ करत नाहीत. अशा मुलांची काळजी घेण्यासाठी कुंदन ताई अहोरात्र मेहनत घेत आहेत.  

Navratri 2024
Navratri 2024 7th Colour: आज नवरात्रीचा शुभ रंग निळा, स्टायलिश लूक हवा असेल तर या अभिनेत्रींकडून घ्या आउटफिटची आयडिया

एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करण्याची प्रेरणा एका पेपरमधील बातमीतून मिळाली. एकदा पालकांच्या मृत्यूनंतर एचआयव्ही झालेल्या मुलाची काळजी नीट घेतली जात नाही, अशा आशयाची एक बातमी आली आणि बनसोडे परिवार पुढे सरसावला. त्यांनी त्या बातमीचं कात्रण घेऊन थेट त्या घरातील पालकांशी संवाद साधला.

त्या मुलांच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वीकारली. प्रत्येक महिन्याला रक्कम पोच व्हायची; पण त्या मुलांसाठी ती खर्च होत नसल्याचं निदर्शनास येताच बनसोडे परिवाराने समाजातील अशा मुलांसाठी 'करुणालय' स्थापन करण्याचा संकल्प केला आणि तो तडीसही नेला.

Navratri 2024
Navratri 2024 : कोकणातील या देवीच्या तलावात परडीतली फुलं होतात सोन्याची, आख्यायिकेत दडलंय गुपित!

कोल्हापूरपासून हाकेच्या अंतरावरील रामनगर (शिये) येथील माळावर हा आश्रम असून, समाजातील दातृत्वाच्या जोरावरच १४ एप्रिल २००६ पासून काम सुरू आहे. सध्या करुणालयात पंचवीस मुलं आहेत आणि त्यांना सकाळी अंघोळ, शाळेचा डब्बा करण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंतची त्यांची सर्व कामं करतात, त्या कुंदन बनसोडे, त्यांचं शिक्षण एमए, एमएसडब्ल्यू. मनात आणलं असतं तर कुठेही पाच आकडी पगाराची नोकरी शक्य होती.

पण पती आनंद यांच्यासह त्यांनी करुणालयाचा गाडा नेटाने हाकायचा ठरवलं. त्यांचे पती आनंद हे आपल्या बहीण-भावांसह आश्रमात शिकून मोठे झालेले. त्यामुळे आश्रमात राहणाऱ्या मुलांची मानसिकता, त्यांना मिळणाऱ्या सुविधा अशा संपूर्ण गोष्टींची जाण त्यांना आहे.

कुंदन बनसोडे यांनी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून समाजशास्त्राची एम.एस.डब्ल्यु ही पदवी घेतली आणि या शिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी केला. कुंदन यांनी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून समाजशास्त्राची एम.एस.डब्ल्यु ही पदवी घेतली आणि या शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळविण्यासाठी न करता एचआयव्ही बाधितांच्या मुलांसाठी काम सुरु करुन एक उदाहरणच सादर केलं आहे.

वर्ष २००६ मध्ये एचआय व्ही बाधितांच्या तीन मुलांना घेवून त्यांनी त्यांच्या करुणालय या संस्थेचाा शुभारंभ केला. हाती तुटपुंजी साधने, आर्थिक पाठबळ बेताचे, कोणतीही सरकारी मदत नाही अशा अवस्थेत हे शिवधनुष्य उचलण्याचं धाडस केवळ कुंदनताईंनी केलं. साहजिकच येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक मुलाची स्वतःच्या मुलाइतकीच काळजी ते घेतात.

करुणालयात असणारी २५ आणि बाहेर विविध ठिकाणी राहणारी ६३ अशा एकूण ८८ मुलांसाठी ते आजही झटताहेत. त्यातील काही मुलांचं पुनर्वसनही त्यांनी केलं आहे. तसेच, जवळपास १५ मुलामुलींची लग्ने करून दिली आहेत. ते सर्व सुखी परिवार आहेत काही जोडप्यांना मुलं झाली आहेत ती एड्स निगेटिव्ह आहेत.

सर्वांना पौष्टिक आहार, वस्त्रे, निवासाची उत्तम व्यवस्था, सुरक्षितता, शाळेला नेण्या आणण्यासाठीची व्यवस्था सारं काही मिळतं. दुसरीकडे दररोज प्रवेशांची मागणी असूनही अपुरी जागा, निधीमुळे कार्याला मर्यादांचं बंधन आहे. भविष्यात अशा असंख्य गरजूंसाठी सेवा पुरविण्यास 'करुणालय' तयार आहे; पण खर्चाचा ताळमेळ घालताना नाकीनऊ येतात, हे वास्तव आहे. राज्यभरातून प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी आहे.

Navratri 2024
Navratri 2024 : तुळजापूर, माहूरमध्ये गर्दीचा ओघ सुरूच...तुळजाभवानीमातेची मुरलीअलंकार महापूजा

शासनाकडे २००७ पासून मदतीसाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला असला, तरी दखल घेतलेली नाही आणि तरीही न खचता, न डगमगता कुंदन आणि त्यांच्या परिवाराची ही समाजोपयोगी संघर्षयात्रा सुरूच आहे.

आमच्या संस्थेत जोतिबावर सोडून दिलेली एक छोटी मुलगी आलेली. जोतिबावर तिचे आई वडिल तिला सोडून गेले. कोडोली पोलिसांनी पाच-सहा वर्षांच्या त्या मुलीला ताब्यात घेतले. तिला नाव विचारले; पण पोलिसांच्या लक्षात आले, तिला बोलताही येत नाही आणि ऐकताही येत नाही. कागदोपत्री प्रक्रिया झाली, मुलगी अनोथ आश्रमात आणली.

Navratri 2024
Navratri 2024 : नवरात्रीचा सहावा दिवस अशी करा माता कात्यायनीची पूजा, देवीसमोर वाचा पौराणिक कथा

मुलीला सदर्दी खोकला सुरू झाला. पुढे पुढे वाढतच गेला; मग तिच्या रक्ताची तपासणी झाली आणि ही मुलगी जन्मतः एचआयव्हीबाधित असल्याचे आणि अशा मुलीला कसे पोसायचे म्हणून तिला कोणीतरी यात्रेत सोडून दिल्याचे स्पष्ट झाले. पुढे तिला शिये येथील करुणालय संस्थेत पाठवण्यात आले. मुलीला बोलता येत नाही म्हणून तिचे नाव अबोली ठेवले. सध्या ही मुलगी करूणालयात असून १४ वर्षांची झाली असून ती वडगावच्या मुकबधिर शाळेत शिक्षण घेत आहे. आहे.

एड्सबद्दल कुंदन सांगतात की, एचआयव्ही-एड्स म्हणलं की सगळ्यांनाच धडकी भरते. या आजाराचे विषाणू १९८४ च्या सुमारास प्रथम अमेरिकेत सापडले. या आजाराने अनेक मोठ्या नटांचे आणि उद्योजकांचे प्राण घेतले आहेत. हा आजार माणसाला शरिरानेच खचवून टाकतो असे नाही तर बाधिताला मनानेही संपवतो. या आजाराचे विषाणू बाधित व्यक्तीशी शरीर संबंध आल्यामुळे लागण करतात.

Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : महिलांना जटामुक्त करणं, निराधारांना साथ देऊन समाजकार्याचा वसा घेतलेली नवदुर्गा गीता हासूरकर

एचआयव्ही बाबतच्या गैरसमजामुळे लोक या रुग्णांशी विचित्रपणे वागतात, यांचेपासून दूर रहाणे पसंत करतात. स्वयंसेवी संस्था आणि सरकार यांनी लोकशिक्षण केल्यामुळे थोडातरी फरक पडला आहे. एचआयव्ही बाधितांचा प्रश्न त्यांच्यापुरताच मर्यादित रहात नाही. तो आजार पुढच्या पिढीकडेही जातो. म्हणजे ज्यांचा काहीच दोष नाही अशांना जन्मापासूनच हा आजार आणि त्याचे दुष्परिणाम घेऊन जगणे भाग पडते, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी त्यांच्या संस्थेतून २३ मुलांचे पुनर्वसन झाले आहे. काही मुली नर्स झाल्या आहेत, काही शिक्षिका तर मुले अनेक व्यवसायत आहेत. याचा अर्थ असा आहे की आपल्या करुणालयाच्या आधारावर ही २३ आयुष्ये आकाराला आली आहेत, भविष्याकडे झेपावत आहेत.

महाराष्ट्र शेफर्डस् काऊन्सील, गृहिणी महोत्सव, दैनिक सकाळचा युवा समाजभूषण पुरस्कार, जागो कोल्हापूर, रोटरी पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने आपला यथोचित सन्मान झाला आहे. आपल्या या कार्याचं कौतुक करण्यासाठी कोरीया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, नायझेरिया इ. देशातील समाज सेवकांनी आपल्या संस्थेस भेट दिली आहे. अशा समाडकार्याचा वसा घेतलेल्या कुंदनताईंना आमचा सलाम!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.