Navratri 2024 : 'पाळीविषयी बोलताना काहींनी ऐकून घेतलं तर काहींनी गावाबाहेर काढलं' सांगताहेत समाजबंधच्या शर्वरीताई

समाजबंधच्या सत्याचे प्रयोग शिबिरामध्ये असे अनुभव येऊन देखील न थांबता कार्यकर्त्यांनी काम चालूच ठेवलं.
Navratri 2024
Navratri 2024 esakal
Updated on

Navratri special success story :

गडचिरोली मधील काही आदिवासी जमातींमध्ये पाळी आलेल्या महिलांना बाहेर एका झोपडीत रहावे लागते ज्याला 'कुर्माघर' असे म्हणतात. या झोपडीत ना कुठल्या सुविधा असतात, ना स्वच्छता ना सुरक्षितता असते. केवळ प्रथेचा भाग म्हणून महिलांना येथे मनाविरुद्ध रहावे लागते. हीच परिस्थिती बदलण्यासाठी तिथल्या ३५ गावामध्ये समाजबंध संस्था सत्याचे प्रयोग शिबिर घेते. त्यात शिबिरात वेगवेगळ्या गावात आमच्यासोबत काम करणाऱ्या तरूणी होत्या. त्यातल्या एका मुलीला पाळी आली.

गावच्या नियमानुसार पाळी आलेल्या महिलांना कुर्माघरात रहावे लागते म्हणून ती थोडी घाबरली. तिथल्या लोकांना जेव्हा याबद्दल जेव्हा तिने सांगितलं आणि कुर्माघरात न राहण्याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी रात्रीच त्या दोघांना घराबाहेर अन् गावाबाहेर काढलं. तिथे असलेल्या अंगणवाडीच्या समोर त्यांनी रात्र घालवली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे मतपरिवर्तन करूनच ते बाहेर पडले. असं सांगतात समाजबंध या सामाजिक संस्थेच्या विश्वस्त शर्वरी सुरेखा अरुण.

खरं तर शहरात पाळी येणं सामान्य गोष्ट आहे. पण आजही जंगलाला उशाशी घेऊन जगणारी काही गावं आपल्या देशात आहेत. त्यापैकी गडचिरोली,रायगड, वर्धा अशा दुष्काळी अन् जीवन सामान्य नसलेल्या गावांमध्ये २०१८ पासून एक संस्था काम करते. ते ही तिथल्या महिलांना प-पाळीचा शिकवण्यासाठी.

Navratri 2024
Dhule Navratri Flower Rates: नवरात्रोत्सवात फुलांची दरवळ महागणार! झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा आतापासूनच खोतोय भाव

या संस्थेसोबत काम करते शर्वरी ताई. आईवडीलांचे नाव पुढे नेणाऱ्या काहींपैकी ही एक शर्वरी सुरेखा अरूण. शर्वरी मूळची कोल्हापूरची. शिवाजी विद्यापीठातून MA English, D Ed. ही पदवी संपादन केली. शालेय वयात Gymnastics मधील रोप -मल्लखांब या खेळात विशेष प्राविन्य, राज्य पातळीवर सहभागी असे. पण वडिलांची फिरती नोकरी आणि घरातून या खेळासाठी म्हणावी तशी साथ न मिळाल्याने राज्य स्तराच्या पुढे खेळता आले नाही.

पुढे, शर्वरीने मुक्त विद्यापीठातून BA पूर्ण केलं. त्यानंतर MA चे कॉलेज करत असताना कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीत Gymnastics Coach म्हणूनही काम केले. विशेष बाब म्हणजे ज्या खेळात शक्यतो मुलांचे वर्चस्व असते अशा या खेळात मुलींना प्रोत्साहित करत, त्यांच्या पालकांशी संवाद साधत अनेक मुलींना राज्य स्तरावर विविध स्पर्धेसाठी घेऊन गेली.

Navratri 2024
Jalgaon Navratri 2024 : गरबा-दांडियासाठी नवरंगी पोषाखाला पसंती! नवरात्रोत्सवासाठी भाविक सज्ज; तरुणाईची उत्सुकता शिगेला
मुलींना मार्गदर्शन करताना शर्वरी
मुलींना मार्गदर्शन करताना शर्वरी

D. Ed. पूर्ण झाले तेव्हा शिक्षक भरतीचा प्रश्न नुकताच सुरु झालेला. त्या विषयाला धरून होणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याशी संपर्क आला. आणि विवेकाची कवाडे खुली झाली. प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करताना अनेक छोट्या मोठ्या उपक्रमात सहभागी होत अंध बांधवांना घेऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ती भारत-पाकिस्तान सीमेवर ही गेली.

अभयारण्य अंध बांधवांना ही अनुभवता यावं यासाठी राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्यातील sensory wildlife sanctuary हा देशातील पहिला भन्नाट प्रकल्प ही तिने आणि सहकाऱ्यांनी साकारला. त्याच काळात ती मुस्लिम सत्यशोधक मंडळ, AIYF, AISF, भारतीय महिला फेडरेशन या संघटनामध्ये सक्रियपणे कार्यरत होती. सोबतीला शिक्षण, अभ्यास आणि शिकवणं चालूच होतं.

महिलांना मार्गदर्शन करणे
महिलांना मार्गदर्शन करणेesakal
Navratri 2024
Navaratri 2023 : उत्सव साजरा करा, पण जरा सांभाळून!

याच दरम्यान एका सामाजिक परिषदेसाठी ती पुण्यात आली असता समाजबंध संस्थेमार्फत मासिक पाळी विषयावर काम करणाऱ्या सचिन आशा सुभाष या तरुणाला ती पहिल्यांदा भेटली. फेसबुकवर ओळख होतीच पण प्रत्यक्षातील भेटीने आणखी घट्ट मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी मिळून पुण्यात कात्रज भागात समाजबंध प्रकल्पाजवळच स्थलांतरीत लोकांच्या मुलांसाठी पूर्व प्राथमिक शाळा सुरु करण्याचं ठरवलं आणि शर्वरी कोल्हापुरातील चांगली नोकरी सोडून पुण्यात आली.

स्वतःचीच शाळा असल्याने शर्वरी स्वतःला फक्त दीड दोन हजार रुपये मानधन घेत असे आणि खर्च भागवण्यासाठी दुसरी नोकरी ही करत असे. शाळेनिमित्त वाढलेल्या सहवासातून दोघांचं अव्यक्त प्रेम तर फुलत गेलंच पण नुकतंच सुरु झालेलं समाजबंधचं काम ही दुप्पट वेगाने वाढायला सुरुवात झाली. शर्वरी हाडाची शिक्षिका असल्याने मासिक पाळीचे वर्ग ही ती फारच कलात्मक पद्धतीने घेई.

शाळकरी मुलींना पाळी समजावताना
शाळकरी मुलींना पाळी समजावतानाesakal

दोघांनीही सत्यशोधक लग्नाचा पर्याय निवडला. २६ जानेवारी २०१९ रोजी पुण्यात अनोख्या पद्धतीने सत्यशोधक विवाह बंधनात दोघांनी प्रवेश केला. त्यानिमित्ताने आलेल्या लोकांना भेट देण्यासाठी शर्वरीने 'विवेकी सहजीवन' हे पुस्तक लिहिले.

लग्नानंतर सचिन शर्वरी या जोडीने मासिक पाळी या विषयावर जनजागृती करत जवळजवळ अर्धा महाराष्ट्र पिंजून काढला. पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूरला, वर्धा, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव अशा विविध ठिकाणी याविषयी आजवर २५०+ सत्र शर्वरीने घेतली आहेत.

Navratri 2024
Navratri : ५५० किलोचे चांदीचे सिंहासन अन् फुलांची सजावट, नवरात्रोत्‍सवासाठी महालक्ष्मी मंदिर सज्ज

या संपूर्ण कामाच्या आव्हानांबद्दल शर्वरी सांगते की, काही वयस्कर महिला अशा असतात ज्यांना आम्ही तिथे गेलेलं, त्यांच्याशी पाळी विषयी बोललेलं आवडत नाही. त्या आम्हाला तिथून जायला सांगतात. पण, काही तरूण महिला आमचं ऐकायला उत्सुक असतात. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा शाळेतील मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला. शाळेतून आम्ही त्यांच्या वस्त्यांवर जाऊ लागलो. तिथे आम्ही माहिती देतो, महिलांना पॅड्सबद्दल सांगतो. तर, आता अशी परिस्थिती आहे की, त्यांच्यातीलच काही मुली आमच्या स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. आणि हे आमच्या प्रयत्नांना मिळणारं यश आहे,असेही ती म्हणाली.

Navratri 2024
Navratri 2024 : नवरात्र आणि 'नऊ'चे महत्त्व जाणून घ्या

आदिवासी भागात आजही एखाद्या महिलेला पाळी आली तर तिला गावापासून दूर जावं लागतं. अगदी पडक्या अवस्थेतील झोपडीत रहावं लागतं. ज्यात त्यांना मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. तर, उलट त्यांचे हालच जास्त होतात. अशा या झोपड्यांना कूर्माघर म्हणतात.

काही कोवळ्या नुकत्याच वयात आलेल्या मुलींनाही तिथे जावे लागते. कुर्माघरात साप,किडे यांचेही वर्चस्व असते. अशा झोपडीत राहणे म्हणजे मुलींचा जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे.  

Navratri 2024
Navaratri 2023 : मंगळवेढ्यात शारदीय नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी

तसेच अनेक महिला, बचत गटांना कापडी पॅड बनवण्याचे प्रशिक्षण ही दिले आहे. मासिक पाळी व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्याना शर्वरीने पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात मध्ये जाऊन प्रशिक्षण देत राष्ट्रीय प्रशिक्षक अशी ओळख तयार केली आहे.

चार वर्षांपूर्वी दोघांनी पुणे सोडलं आणि कातकरी आदिवासी बहुल असणाऱ्या रायगडमधील पेण तालुक्यात गागोदे या गावी आपला मुक्काम हलववा. तिथेच एका कातकरी वाडीवर कापडी पॅड निर्मितीचा प्रकल्प सुरु करून आसपासच्या वाड्यांवर ते पॅड कातकरी आदिवासी महिलांना एकदा वापरायला मोफत देऊन त्याविषयी जनजागृती केली जाते.

Navratri 2024
Navratri 2024 : नवरात्र आणि 'नऊ'चे महत्त्व जाणून घ्या

कमीतकमी संसाधनात राहून जीवनावश्यक आहे तेवढंच घ्यायचं आणि तेवढं घेण्यासाठी लागतात तेवढेच पैसे कमावायचे हा साधा नियम दोघांनी लावून घेतला आहे. त्यामुळेच दोघेही पूर्णवेळ कार्यकर्ता बनून समाज सुधारनेचे काम करू शकत आहेत.

शर्वरीने गागोदेच्या शांततेत राहून 'प - पाळीचा' किशोरी आरोग्य पुस्तिकेचे लेखन केले ज्याच्या आजवर ९०,००० प्रती मुलींपर्यंत पोहोचल्या आहेत. त्याचसोबत 'ती'चा स्वातंत्र्यलढा, ते पाच दिवस अनुभवकथन या पुस्तकांचे संपादन ही तिने केले आहे.

शर्वरी मासिक पाळीचे केवळ संवाद सत्र घेत नाही तर या विषयात काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना ती संवादक प्रशिक्षण ही देते. समाजबंधचे आता महाराष्ट्रात ६० हुन अधिक प्रशिक्षित संवादक कार्यरत आहेत. तळागाळातील महिलांपर्यंत ती पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.