Latest Maharashtra News Updates: शासकीय इतमामात बाबा सिद्दिकींवर अंत्यविधी

Breaking Marathi News Updates 13th October 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

Baba Siddique Funeral Live:  शासकीय इतमामात बाबा सिद्दिकींवर अंत्यविधी

शासकीय इतमामात बाबा सिद्दिकींवर अंत्यविधी पार पडला आहे.

Baba Siddique Funeral Live:  अजित पवार, छगन भुजबळ दफनविधीसाठी दाखल

अजित पवार, छगन भुजबळ दफनविधीसाठी दाखल झाले आहेत. तसेच रामदास आठवलेही दाखल झाले आहेत.

Baba Siddique Funeral Live:  निर्मल नगर गोळीबार प्रकरणी शुभम लोणकरचा २८ वर्षीय भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक

निर्मल नगर गोळीबार प्रकरणी शुभम लोणकरचा २८ वर्षीय भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शुभम लोणकरसह धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना या कटात सामील करून घेतलेल्या कटकारस्थानांपैकी तो एक आहे. पुढील तपास सुरू आहे.

Baba Siddique Funeral Live:  बडा कब्रस्तानमध्ये बाबा सिद्दिकींचे पार्थिव आणले

बडा कब्रस्तानमध्ये बाबा सिद्दिकींचे पार्थिव आणले आहे. थोड्याच वेळात दफनविधी होईल.

Baba Siddique Funeral Live: वांद्रे येथील बाबा सिद्दीकीच्या निवासस्थानाबाहेर नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आली

Baba Siddique Funeral Live: बाबा सिद्दीकींच्या अंतयात्रेला मोठी गर्दी

बाबा सिद्दीकींच्या अंतयात्रेला मोठी गर्दी झाली आहे. अनेक लोकांनी उपस्थिती लावली आहे.

Baba Siddique Funeral Live: बाबा सिद्दीकींच्या अंतयात्रेला सुरूवात

बाबा सिद्दीकींच्या अंतयात्रेला सुरूवात झाली आहे. यावेळी मोठी गर्दी झाली आहे.

Baba Siddique Funeral Live:  बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत

बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यावर बडा कब्रिस्तान दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

Baba Siddique Funeral Live: बाबा सिद्दिकी यांचे पार्थिव घराबाहेर आणलं

बाबा सिद्दिकी यांचे पार्थिव घराबाहेर आणलं आहे. थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले आहेत.

भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची हरियाणा राज्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती

भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची हरियाणा राज्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

Baba Siddique Murder Live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई गुन्हे शाखेत आणण्यात आले

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई गुन्हे शाखेत आणण्यात आले आहे.

 Baba Siddique Murder Live:  मंत्री आदिती तटकरे बाबा सिद्दीकींच्या घरी दाखल

महाराष्ट्राच्या मंत्री आदिती तटकरे या राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या घरी पोहोचल्या आहेत. आज दिवसभरात अनेक राजकीय मंत्र्यांनी सिद्दीकी यांच्या निवासस्थानी भेट दिली.

Women’s T20 World Cup Live : महिला T20 विश्वचषक सामन्यात इंग्लंडचा स्कॉटलंडवर 10 विकेट्सनी विजय

शारजाह येथे झालेल्या महिला T20 विश्वचषक सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडवर 10 विकेट्सने मात केली

Baba Siddique Murder Live: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी गुरमिल सिंग याला २१ ऑक्टोबर पर्यंत कोठडी

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी गुरमिल सिंग याला २१ ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन असल्याचा दावा करणाऱ्या धर्मराज काश्यप याची बोन ossification टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Aditya Thackeray Live : आदित्य ठाकरेंनी घेतली बाबा सिद्दीकींच्या कुटुंबियांची भेट

शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी भेट दिली.

CM Shinde Live : मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते मुंबई-पुणे उत्तरवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबई-पुणे उत्तरवाहिनी मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. रेवस-रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गावरील ७ खाडी पुलांच्या कामांचे ई-भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले.

Baba Siddique Murder Live : 'मुंबईत बाबा सिद्दीकींची हत्या, सरकारचं अपयश'

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, 'आम्ही उघडपणे सांगितले की तिथल्या (महाराष्ट्रात) कायदा आणि सुव्यवस्था चांगली नाही. जीवाला धोका असल्याचे सांगूनही पोलीस त्याला संरक्षण देऊ शकले नसतील तर हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. मुंबईसारख्या परिसरात पोलिसांनी सदैव सतर्क राहायला हवे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांबाबत सरकारने चिंता व्यक्त केली नाही, तर या घटनांकडे दुर्लक्ष करत आहे, असे मला वाटते.

President Draupadi Murmu Live: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु तीन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आजपासून अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावी या तीन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. राष्ट्रपतींचा हा सात दिवसांचा दौराअसून तीन आफ्रिकी देशांना भेट देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती ठरणार आहेत.

Baba Siddique Murder Live : बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या तपासासाठी दिल्ली पोलीस विशेष पथक मुंबईत येणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस विशेष पथक मुंबईत पाठवणार आहेत.

Baba Siddique Murder Live : बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २००४ ते २००८ या काळात बाबा सिद्दिकी यांनी विविध खात्यांचे राज्यमंत्री व म्हाडाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले.

Sanjay Raut Live : राज्यपालांनी देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री पदावरून हटवावे : संजय राऊत

“मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था चांगली होती.मात्र, आता पोलिसांची भीती राहिली नाही.महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी राजीनामा द्यावा, असे आम्ही म्हणत आहोत. मात्र, आता परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे राज्यपालांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून हटवावे,” असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.

Salman Khan Live : सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढली

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानचे निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Baba Siddique Murder Live: बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. हत्या आणि आर्मस ॲक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला असून गुर्मैल सिंह,२३ राहणार हरियाणा आणि धर्मराज कश्यप,१९ राहणार उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे.

Baba Siddique Murder Live: बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी प्रतिक्रिया देताना वकील उज्ज्वल निकम म्हणाले, "मुंबईत काल रात्री घडलेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून कोणत्याही राजकीय नेत्याची हत्या झाली नव्हती. ही हत्या का झाली आणि कोणी केली हा मुख्य प्रश्न आहे. दोन संशयितांना जमावाने जागीच पकडले आणि तिसरा हल्लेखोर पळून गेल्याचे मला समजले.

Baba Siddique Murder Live: बाबा सिद्दीकींची हत्या करणारे ते दीड ते दोन महिन्यांपासून मुंबईत

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात हरियाणातील कर्नैल सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती, ते दीड ते दोन महिन्यांपासून मुंबईत होते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू, मुंबई गुन्हे शाखेची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Baba Siddique Murder Live: माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्येने महाराष्ट्र हादरला

Latest Marathi Live Updates 12 October 2024 : विधानसभेच्या तोंडावर मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार झिशान सिद्दीकींचे वडिल बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली आहे.

विधानसभा निवडणुकीची #ElectionWithSakal तारीख येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे.

त्याचबरोबर पुढील दोन दिवस हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.