Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी आले 1 कोटी अर्ज!

Ekanth Shinde: पुण्यातून सर्वाधिक अर्ज आले असले तरी वाशीम, हिंगोली, सिंधुदुर्गपर्यंत अगदी कमी प्रमाणात अर्ज आले आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने ही योजना लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी २५० कोटींपेक्षा जास्त खर्च माहिती व जनसंपर्क विभागामार्फत केला जाणार आहे. या योजनेसाठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज आले असले तरी वाशीम, हिंगोली, सिंधुदुर्गपर्यंत अगदी कमी प्रमाणात अर्ज आले आहेत.

‘सरकार आपल्या दारी’च्या धर्तीवर राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात यासाठी शिबिरे आयोजित केली जाणार असून महिलांचे अर्ज जागच्या जागी भरुन घेतले जाणार आहेत. ५४ हजार कोटींच्या या योजनेवर २५० कोटींपेक्षा जास्त खर्च प्रसिध्दी करण्यावर दिला जाणार आहे. यावेळी आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांतच अर्ज भरुन घेणे, आधार कार्ड लिंक करणे, बॅंक खाते उघडण्यासारखे उपक्रम एकाच छताखाली राबविण्याचाही विभागाचा विचार आहे.

Ladki Bahin Yojana
Ekanth Shinde: विद्यमान खासदारांना नकार मुख्यमंत्र्यांना पडणार महागात?; वाचा कसा होणार शिंदेंना तोटा

या योजनेंतर्गत आतापर्यंत एक कोटी अर्ज आले आहेत. मात्र पावणे तीन कोटी महिला या योजनेत पात्र ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे महिलांपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे मोहिम राबविली जाणार आहे. अनेक महिलांकडे बॅंक खाते नाही, आधार कार्ड बॅंक खात्यासोबत आणि मोबाईलसोबत लिंक नाही अशा तांत्रिक अडचणींचा सामना महिलांना करावा लागत आहे. त्यामुळे अशा अडचणींवर मात करण्यासाठी ही मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Ladki Bahin Yojana
Ekanth Shinde: राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा कुठे आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारवर गंभीर आरोप

सेतू केंद्रचालकांची अडचण

‘नारी शक्तीदूत’ या ॲपशिवाय या योजनेचा ऑनलाइन अर्ज भरता येत नाही. प्रत्येक अर्ज भरण्यासाठी राज्य सरकार सेतूधारकांना प्रत्येकी अर्जास पन्नास रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्याची नोंदणी कुठेच होत नसल्याने राज्य सरकार आम्हाला कसे पैसे देणार, असा प्रश्न सेतू धारकांना पडला आहे. त्याचबरोबर नारीशक्ती ॲप वरून खाजगी व्यक्ती, अंगणसेविका, व इतर कोणीही अर्ज भरू शकत असल्याने त्याची कोणतीच माहिती राज्य सरकारकडे नसल्याने आम्हाला नेमके पैसे कसे देणार सवालही सेतूधारकांनी व्यक्त केला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com