सव्वादहा लाख लाडक्या बहिणींचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी! आता अंगणवाडी सेविकांमार्फतच करता येतील अर्ज; वाचा, कोणत्या तालुक्यातून किती महिलांचे अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत अनिवार्य आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दहा लाख २७ हजार ६२७ महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यातील केवळ तीन हजार ३९९ अर्ज नामंजूर झाले आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत अनिवार्य आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दहा लाख २७ हजार ६२७ महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यातील केवळ तीन हजार ३९९ अर्ज नामंजूर झाले आहेत. पंढरपूर, माळशिरस, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर (सोलापूर शहर) येथून सर्वाधिक महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. १ जुलैपासून ही योजना लागू करण्यात आली आहे. अजूनही अर्ज केलेल्या सर्व महिलांना लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे पहिल्या टप्प्यात लाभ मिळालेल्यांनाही अजून पुढील महिन्यातील लाभ मिळाला नाही. बार्शी, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, दक्षिण व उत्तर सोलापूर या तालुक्यातून ८२ हजार ते सव्वालाखांपर्यंत अर्ज प्राप्त झाले आहेत.

सुरवातीला ‘नारीशक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर शासनाच्या ‘लाडकी बहीण’ या संकेतस्थळावरून अर्ज स्वीकारले. आता केवळ अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातूनच अर्ज घेतले जात आहेत. अर्जदाराला वैयक्तिकरित्या अर्ज करता येणार नाही. दरम्यान, योजनेतील सर्व लाभार्थींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील तीन हजार ११९ लाभार्थींनी खरेदी केलेल्या गॅस सिलिंडरसाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. त्यासंबंधीचा अहवाल दररोज पुरवठा विभागाला पाठविण्यात येत आहे.

तरूणाने महिलेचा फोटो जोडून केला अर्ज

जिल्ह्यातील एका तरुणाने आधारकार्डवर नावात बदल करून दुसऱ्याच एका महिलेचा फोटो जोडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. तर एकाने स्वत:च्या फोटोऐवजी घरातील पलंगाचा, रेडोओचा फोटो अपलोड केला होता. काही पुरुषांनी स्वत:चेच फोटो अपलोड करून अर्ज केल्याचेही पडताळणीत समोर आले. अधिकाऱ्यांनी संबंधितांना समज देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण दहा लाख २७ हजार ६२७ अर्जातील तीन हजार ३९९ अर्ज बाद करण्यात आले आहेत.

अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातूनच अर्ज

जिल्ह्यातून आतापर्यंत दहा लाखांहून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. आता योजनेतून अर्ज करण्यासाठी सप्टेंबरअखेर मुदत असून सध्या केवळ अंगणवाडी सेविकांच्या मार्फतच अर्ज भरता येतील.

- प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

तालुकानिहाय अर्जांची संख्या

तालुका अर्जदार महिला

  • अक्कलकोट ७२,७५६

  • बार्शी ८४,५४७

  • करमाळा ६२,१०३

  • माढा ७६,२५६

  • माळशिरस १,२२,०१३

  • मंगळवेढा ५१,४४७

  • मोहोळ ६८,८९७

  • पंढरपूर १,१२,०९९

  • सांगोला ८२,५९३

  • उत्तर सोलापूर १,९६,८५६

  • दक्षिण सोलापूर ९८,०६०

  • एकूण १०,२७,६२७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.