Ladki Bahin Yojana: "कुणी मायचा लाल..."; लाडकी बहीण योजनेवरुन केलेल्या वक्तव्यामुळे अजितदादांनी रवी राणांना झापलं!

Ajit Pawar's Stern Warning: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे या योजनेवरून विवाद निर्माण झाला आहे.
Ajit Pawar addressing sabha regarding Ravi Rana's controversial remarks on the Ladki Behan Yojana.
Ajit Pawar addressing sabha regarding Ravi Rana's controversial remarks on the Ladki Behan Yojana.esakal
Updated on

लाडकी बहीण योजनेवरुन केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांना अजित पवार यांनी चांगलेच झापलं आहे. महायुतीतील महाभग बोलतात पैसे परत घेऊ, त्यांच्याकडे मंदिरातील घंटा आहे का, असे अजित पवार म्हणाले. रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे या योजनेवरून विवाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी यावर ठाम भूमिका घेतली असून, महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे या वादामुळे महायुतीतील तणाव वाढला आहे.

अजित पवारांचा कडक इशारा

"मी माझ्या माय माऊलींना सांगतो, कुणी मायचा लाल तुमच्या अकाऊंटला गेलेला पैसा परत घेऊ शकत नाही. त्यांच्या (रवी राणा) हातात काय देवळात वाजवायची घंटा आहे का? १७ तारखेला महाराष्ट्रातील माय माऊलींच्या कमीत कमी एक कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. हा दिलेला शब्द आहे. आपण शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वादा आहे," असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar addressing sabha regarding Ravi Rana's controversial remarks on the Ladki Behan Yojana.
Ladki Bahin: आशीर्वाद द्या, नाहीतर 'लाडकी बहि‍णीं'चे 1,500 रुपये काढून घेऊ; रवी राणा यांचे धक्कादायक वक्तव्य

रवी राणा काय म्हणाले होते?

रवी राणा यांनी विधानसभेसाठी आपले मतदारांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. "आमचे सरकार आले तर तुम्हाला देण्यात येणारे पैसे दीड हजारवरून तीन हजार करू. पण, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही त्यांच्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेऊ. तुमचा भाऊ म्हणून मी हे सांगत आहे," असे राणा म्हणाले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा अमरावती येथे रवी राणा यांनी घेतला होता. यावेळी ते बोलत होते. "ज्याचं खाल्लं त्यांचं जागलं पाहिजे. सरकार देत आहे, पण त्यांना आर्शीवादही मिळायला हवा," असे वक्तव्य त्यांनी केले.

विरोधकांची प्रतिक्रिया

रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

Ajit Pawar addressing sabha regarding Ravi Rana's controversial remarks on the Ladki Behan Yojana.
Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले, आता पुढे काय? मुख्यमंत्र्यांनी दिली आणखी एक गुड न्यूज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.