छत्रपती संभाजीनगर - ‘अतिशय कमी वेळेत लाडकी बहीण योजनेला मिळालेले यश पाहून विरोधकांचे म्हणजेच महाराष्ट्र विकास आघाडीचे धाबे दणाणले. या योजनेबाबत विरोधकांनी खोटा प्रचार करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फायदा झाला नाही आणि म्हणूनच त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘पंचसूत्री’ कार्यक्रम आणला,’ असा दावा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७५ पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.