Mangalvedha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मोठा गाजावाजा केला असला तरी सध्या या अर्ज भरण्याचे ॲप आणि पोर्टल चालत नसल्यामुळे या योजनेसाठी अर्ज भरणाय्रा महिलामधून सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होवू लागला.
गत महिन्यात महिन्याभरापासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली यासाठी महिलांना प्रतिमाह दीड हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी सरकारने निश्चित केलेल्या अटीत वारंवार बदल होत होत्या.
अटीच्या बदलाला सुरुवातीच्या काळात महिला त्रस्त झाल्या असतानाच गेले काही दिवसापासून या योजनेसाठी शासनाने नव्याने विकसित केलेले नारीदूत हे ॲप चालत नाही तर लाडकी बहीण पोर्टल देखील गेले काही दिवसापासून बंद असल्यामुळे या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिला त्रस्त झाल्या. राखी पौर्णिमेपर्यंत या योजनेचे अनुदान जमा होणार असल्यामुळे महिला सातत्याने मोबाईलवर ऑनलाईन माहिती व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पळापळ करू लागल्या.
दुसऱ्या बाजूला आतापर्यंत ज्या महिलांनी अॅप व पोर्टल द्वारे अर्ज अपलोड केलेले आहेत त्यापैकी काही महिलांना त्यांचे अर्ज मंजूर झाल्याचा मोबाईल संदेश आला तर काही महिलांना त्यांचे अर्ज नामंजूर झाले असून त्यांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना मोबाईल द्वारे दिल्या आहेत मात्र त्या महिला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी धावाधाव करू लागल्या मात्र पोर्टल आणि ॲप बंद असल्यामुळे महिला आणखीनच त्रस्त झाल्या.
अर्ज मंजूर झालेल्यांचे अनुदान लवकर जमा होणार आणि अर्ज नामंजूर झालेल्या महिलांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने त्या महिलांचा रोज सरकारवर साहजिकच निर्माण होऊ लागला आहे. योजनेचे अनुदान सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्याच्या बहीण असलेल्या महिलांना इतका त्रास दिला जात आहे. त्यामुळे ही योजना भविष्यात चालणार की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.