Uddhav Thackeray: ''पीएम केअर फंडातला घोटाळा ७० हजार कोटींच्या घोटाळ्याला लाजवेल एवढा मोठा'' उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

Mahavikas Aaghadi: काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करावे मी त्यांना सरसकट पाठिंबा देईन. मला पुन्हा येईन असे कधी वाटलेले नाही.. हिंदुत्व हे हिंदुत्व आहे, पण काळानुसार भूमिका घ्याव्या लागतात, मला शेंडी-जानवे आणि घंटा बडवणारे हिंदुत्व नकोय, हे माझे वाक्य नाही बाळासाहेबांचे आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

मुंबईः पन्नास खोके घेऊन सत्तेमध्ये गेलेल्यांनी लाडक्या बहिणींना केवळ दीड हजार रुपये देऊ केले आहेत. मी कोविडमध्ये कामं केली पण कधीच म्हटलं नाही मिळाले का पैसे? पीएम केअर फंडाबाबत कुणीही बोलत नाही. त्यामध्ये इतके मोठे घोटाळे झालेत की ७० हजार कोटींचा घोटाळाही लाजेल, अशी परिस्थिती आहे.. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

''मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करावं''

मंगळवारी आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करावे मी त्यांना सरसकट पाठिंबा देईन. मला पुन्हा येईन असे कधी वाटलेले नाही.. हिंदुत्व हे हिंदुत्व आहे, पण काळानुसार भूमिका घ्याव्या लागतात, मला शेंडी-जानवे आणि घंटा बडवणारे हिंदुत्व नकोय, हे माझे वाक्य नाही बाळासाहेबांचे आहे.

Uddhav Thackeray
Tata Group: टाटा समूह मोठी कंपनी विकणार? एअरटेल खरेदी करणार कंपनीतील हिस्सा; ग्राहकांना काय फायदा होणार?

क्रांतीची सुरुवात

राज्यातल्या सत्ताधाऱ्यांबद्दल बोलतना उद्धव ठाकरे म्हणाले की, युती सरकारच्या काळात सत्ता किती काळ होती? कठीण काळात आम्ही साथ दिली, हे लोक माडीवर चढले आणि आता आम्हाला लाथा मारायला लागले आहेत. आज तुम्ही बघा कोणत्याही राजकारण्याकडे न जाणारे विचारवंत, कलाकार मंडळी आम्हाला साथ देत आहेत, ही क्रांतीची सुरुवात आहे.

''राज्य सरकारने आमच्या हक्काचे पैसे ढापले आहेत आणि बहिणींना म्हणतात मिळाले का पैसे? स्वतः ५० खोके घेतले आणि बहिणींना १५०० फक्त देत आहेत. मी कोविडमध्ये कामं केली पण कधीच म्हटलं नाही की, मिळाले का पैसे? PM केअर फंडातील घोटाळ्यांबाबत कोणीही बोलत नाही. इतके मोठे घोटाळे झालेत की, आता ७० हजार कोटींचा घोटाळा लाजेल.'' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • बुरसटलेले हिंदुत्व आम्हाला मान्य नाही

  • हे बाळासाहेबांचे विचार आहेत

  • जो लढा माझ्या आजोबांनी दिला तोच लढा वडिलांनी दिला

  • लोकांची घरे पेटवणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही

  • भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही

  • सबका साथ आणि निवडणूक झाली की मित्रांचा विकास, असं भाजपचं सुरुय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.