या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पत्र कामाला लागले आहे. यातच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. यासाठी आता अनेक इच्छुक नेते त्यांची भेट घेत आहेत. अशातच भाजपच्या एका नेत्याने मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.